Kolhapur Lok Sabha: आचारसंहिता पथकाला चकवा देत जावळ, बारसं, वाढदिवसानिमित्त तांबड्या-पांढऱ्यावर ताव

Kolhapur Constituency: कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मात्र बारसं, जावळ, बड्डेच्या निमित्ताने जेवणावळीला जोर आला आहे. जेवणाचा फक्कड बेत करून तांबड्या-पांढऱ्या रस्यावर ताव मारून मतदारांना आकर्षित करणारी यंत्रणा तयार झाली आहे.
Kolhapur Lok Sabha Constituency
Kolhapur Lok Sabha ConstituencySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला अवघे सहा दिवस शिल्लक राहिलेत. प्रचाराचा कालावधी केवळ पाच दिवस शिल्लक असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha Constituency) मात्र बारसं, जावळ, बड्डेच्या निमित्ताने जेवणावळीला जोर आला आहे. जेवणाचा फक्कड बेत करून तांबड्या-पांढऱ्या रस्यावर ताव मारून मतदारांना आकर्षित करणारी यंत्रणा तयार झाली आहे.

प्रचार अंतिम टप्प्यात येत असतानाच एकीकडे प्रचाराचा जोर वाढत असताना कार्यकर्त्यांसह भागातील लोकांसाठी जेवणावळीही जोरात सुरू आहेत. इतकंच नव्हे तर भरारी पथकाला चकवा देत सुरू असलेल्या जेवणावळीतील प्रचारात धार्मिक कार्यक्रमाबरोबरच जावळ, लग्नाचा वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिका छापून हा उद्योग सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्ह्यातील लोकसभेच्या (Lok Sabha) दोन्हीही जागांसाठी 7 मे रोजी मतदान (Voting) होत आहे. नेत्यांचे दौरे, सभा, भागाभागांत निघणाऱ्या पदयात्रा, कोपरा सभांनी जिल्ह्याचा कानाकोपरा ढवळून निघाला आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या रखरखत्या उन्हात स्पर्धेतील सर्वच उमेदवारांकडून प्रचाराचे रान उठवले जात आहे. 15-20 वर्षांपूर्वी या निवडणुका लागल्या कधी आणि झाल्या कधी हेही कळत नव्हते; पण आजच्या जमान्यात कानाकोपऱ्यात खुट्ट झालेली गोष्ट समाजमाध्यमांच्या माध्यमातून घराघरांत पोहाेचत आहे. त्यातून प्रत्येक घर या ना त्या कारणांनी या प्रचारासोबत जोडले गेल्याचे चित्र आहे.

निवडणूक (Election) लागल्यापासून आतापर्यंत प्रत्यक्ष प्रचारात राबणाऱ्या किंवा नियोजन करणाऱ्यांसाठी श्रमपरिहार म्हणून रात्रीच्या जेवणाची सोय केली जात होती; पण प्रचार जसजसा पुढे जाईल, त्याची जशी रंगत वाढेल आणि ईर्ष्या दिसून येईल तसे आता भागनिहाय जेवणावळीचे नियोजन केले जात आहे. ‘मिसळ पे चर्चा’च्या माध्यमातून सकाळी नाष्टा तर रात्री भागातील प्रमुखांच्या बैठक असल्याचे सांगून ‘तांबडा-पांढरा’चे नियोजन सुरू आहे.

प्रत्येक विधानसभा क्षेत्रनिहाय प्रशासनाने आचारसंहिता भंग होते का नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पथके नेमली आहेत. या पथकांना चकवा देत अशा जेवणावळी सुरू आहेत. कारवाईचा बडगा नको म्हणून नसलेले जावळ, वाढदिवस यांसारख्या कार्यक्रमांच्या पत्रिका काढून एक हजार ते 1500 पर्यंत लोकांच्या जेवणाची सोय अगदी मंगल कार्यालयात केली जात आहे. आचारसंहिता पथकाची चौकशी झालीच तर ही पत्रिका आणि संबंधितांना पुढे केले जात आहे. त्यामुळे आचारसंहिता पथकाचीही कारवाई करताना पंचाईत होत आहे.

Kolhapur Lok Sabha Constituency
Sambhaji Raje's Agreement : संभाजीराजेंचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतचे ॲग्रिमेंट; उद्योगमंत्री सामंत करणार गौप्यस्फोट

यानिमित्ताने भागाभागातील आचाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. संबंधित भागातील एखाद्या प्रमुख कार्यकर्त्यांला या जेवणावळीच्या नियोजनाची जबाबदारी दिली जाते, त्याच्याकडून आपल्या मर्जीतील आचाऱ्याला हे काम दिले जाते. जेवणाच्या साहित्यासह वाढपी, टेबल-खुर्चीसह हे काम मिळत असल्याने ऐन लग्न सराईत या निवडणुकीच्या कामांमुळे आचारीही खूष आहेत.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com