Sambhaji Raje's Agreement : संभाजीराजेंचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबतचे ॲग्रिमेंट; उद्योगमंत्री सामंत करणार गौप्यस्फोट

Lok Sabha Election 2024 : श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याविरोधात महायुतीने उमेदवार देऊन छत्रपतींच्या गादीचा अपमान केला आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून प्रचारात सातत्याने केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सामंत यांनी संबंधित बाबींचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे.
Sambhaji Raje-Uday Samant
Sambhaji Raje-Uday SamantSarkarnama

Kolhapur, 30 April : महाविकास आघाडीकडून सातत्याने महायुतीचे उमेदवार आणि प्रवक्त्यांवर कोल्हापूरच्या गादीचा अपमान करत असल्याची टीका आणि आरोप होत आहे. त्यावर आता महायुतीतील नेत्यांकडून पलटवार करण्यात येत आहे.

मंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करताना राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा अपमान कोणी केला, यावर भाष्य केले आहे. छत्रपतींच्या गादीचा अपमान कुणी केला, संभाजीराजेंवर कसा दबाव टाकण्यात आला. त्यांना उमेदवारी मागे घेण्यास कुणी भाग पाडले, या सर्वांचा एक मे रोजी कोल्हापुरात पर्दाफाश करणार असल्याचा इशारा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिला.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याविरोधात महायुतीने उमेदवार देऊन छत्रपतींच्या गादीचा अपमान केला आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून प्रचारात सातत्याने केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी संबंधित बाबींचा कोल्हापुरात पर्दाफाश करण्याचा इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sambhaji Raje-Uday Samant
Modi's Malshiras Sabha : भाजपनं टायमिंग साधलं; माळशिरसमध्ये मोदींचा पिवळा फेटा बांधत काठी अन्‌ घोंगडं देऊन सत्कार...

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, या निवडणुकीत अनेकांची विनोदबुद्धी फार जागृती झाली आहे. छत्रपती संभाजीराजे यांना तिकीट न देऊन कुणी खऱ्या अर्थाने गादीचा अपमान केला. त्यांच्याकडून कसे ॲग्रिमेंट करून घेण्यात आले. त्यांच्यावर कसा दबाव टाकण्यात आला.

उमेदवारी मागे घेताना संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वारंवार सांगत होते की, एका मंत्र्यांचा फोन आला होता. तो मंत्री मीच होतो. माझ्या बंगल्यावर त्यांच्याकडून कशा पद्धतीने ॲफिडेव्हिट लिहून घेण्यात आले होते. त्यांना कशी उमेदवारी मागे घ्यायला लावली, या सर्व बाबींचा पर्दाफाश लाव रे तो व्हिडिओ अशा पद्धतीने करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

R

Sambhaji Raje-Uday Samant
Modi Malshiras Speech : आता शरद पवारांना शिक्षा देण्याची वेळ आलीय; माळशिरसमधून मोदींचा नाव न घेता हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com