Rajesh Kshirsagar News : क्षीरसागरांनी राजघराण्याची दुखती नस दाबली, कोल्हापूरच्या राजकारणात 'कदमबांडे' नावाची एन्ट्री

Rajesh Kshirsagar On Congress : "छत्रपती घराण्याचा मान कसा राखायचा, हे आम्हाला शिकवू नये," अशा शब्दांत क्षीरसागरांनी काँग्रेसला सुनावलं आहे.
Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagarsarkarnama

Kolhapur News : राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील ( Satej Patil ), सुषमा अंधारे ( Sushma Anadhre ) आणि कोल्हापुरातील छत्रपती घराण्यावर टीकास्त्र सोडलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत असलेल्या टीकेला राजेश क्षीरसागर यांनी उत्तर देताना अनेक विषयांवर भाष्य केले आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सभेनंतर कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय होईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते आज कोल्हापुरात बोलत होते.

राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) म्हणाले, "सतेज पाटील घाणेरडे राजकारण करत असतील, तर कोल्हापूरची जनता तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही फोटो व्हायरल करू म्हणता, तसं तुमचंदेखील संजय मंडलिक यांच्याकडे काहीही असू शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) सभेला येणार म्हणून पाटलांचा जळफळाट का होतोय? ज्या-ज्या ठिकाणी पंतप्रधान मोदी सभा घेतात, त्या-त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतात."

"छत्रपती घराण्याचा मान कसा राखायचा, हे आम्हाला शिकवू नये. संभाजीराजे छत्रपती ( Sambhajiraje Chhatrapati ) यांचा मान आम्हीच ठेवला आहे. काँग्रेसच्या नेत्याने आपल्या गळ्यातील उमेदवारीची माळ शाहू महाराज यांच्या गळ्यात घातली," असा आरोप क्षीरसागरांनी केला."आम्हाला वाटत होतं, या राजकारणात शाहू महाराज यांनी पडू नये. छत्रपती पद हेच सर्वात मोठं पद आहे. मात्र, आता शाहू महाराज एका पक्षाला बांधले गेले आहेत. त्यामुळे राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणार. शाहू महाराज यांचा राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे," अशा शब्दांत क्षीरसागर यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"छत्रपती घराण्याचे खरे वारसदार कोण असा प्रश्न केला जातो. कदमबांडेदेखील या गादीवर हक्क सांगतात. त्याबद्दल न्यायालयीन लढाई सुरू आहे. यांचीदेखील चर्चा या ठिकाणी केली जाते. कोल्हापूरचा दसरा महोत्सव अनेक वर्षे बंद होता. या प्रकरणातील केसेस अजूनदेखील चालू आहेत. छत्रपती घराण्याने राजकारणात पडू नये म्हणून याआधी मालोजीराजे आणि संभाजीराजे यांचा कोल्हापूरकरांनी पराभव केला होता. या निवडणुकीत गादीचा अपमान होणार आहे. काँग्रेसनेच गादीचा अपमान केला आहे. हे करणाऱ्या काँग्रेसला जनता माफ करणार नाही," असा समाचार क्षीरसागरांनी घेतला आहे.

Rajesh Kshirsagar
Satej Patil News : ...नाहीतर 'ते' फोटो व्हायरल करेन; सतेज पाटलांचा मंडलिकांना इशारा, नेमकं प्रकरण काय?

"'एमआयएम'ची एकही शाखा कोल्हापुरात नाही. कोण हे 'एमआयएम' वाले? पुन्हा कोल्हापुरात आले तर आम्ही फोडून काढू, आम्हीदेखील हिंदू आहोत," अशा शब्दांत 'एमआयएम'ला विरोध करताना बोलत क्षीरसागरांनी सुषमा अंधारे ही, 'फालतू आणि पेड बाई आहे," अशी टीका क्षीरसागर यांनी केली.


( Edited By : Akshay Sabale )

R

Rajesh Kshirsagar
Hasan Mushrif News : आम्हीही काठी घेऊन दारात बसू; सतेज पाटलांच्या विधानावर मुश्रीफांचा पलटवार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com