Lok Sabha Election 2024 : शरद पवारांनी डाव टाकला; अकलूज की फलटण निर्णय स्थानिक पातळीवर घ्या...

Madha Loksabha Election : माढ्याचा तिढा सुटला असून, आता संजीवराजे निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांचा गुढीपाडव्याला निर्णय होण्याची शक्यता आहे. कोण निवडणूक लढणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Madha Loksabha Election
Madha Loksabha Election Sarkarnama
Published on
Updated on

Madha loksabha News : माढा आणि साताऱ्याचे उमेदवार लवकर जाहीर होतील, असे सांगून अकलूज की फलटण यापैकी कोणी लढायचे हे त्यांनी ठरवायचे आहे, असे सूचक विधान खासदार शरद पवार यांनी आज केले.

सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघावरून (Madha Lok Sabha ) सध्या राजकीय खल सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून साताऱ्यात व माढ्यात कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर काल खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना काही संकेत दिले आहेत.

भाजपकडून माढा लोकसभेचा (Madha Loksabha) उमेदवार जाहीर झालेला आहे. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार याची उत्सुकता आहे. काल पत्रकारांशी गप्पा मारताना शरद पवारांनी माढ्याचा तिढा सुटला असून, अकलूज की फलटण हे स्थानिक पातळीवर बसून त्यांनी निर्णय करायचा आहे, असे सांगून माढ्याचा निर्णय निंबाळकर व मोहिते पाटलांच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे फलटणमधून संजीवराजे नाईक निंबाळकर की अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यापैकी कोण उमेदवार हे चर्चेतून स्पष्ट होणार आहे. यामध्ये माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे.

Madha Loksabha Election
Lok Sabha Election 2024 : वंचित अन् ठाकरे गटामुळे शेट्टी, मानेंसमोर अडचणींचा डोंगर

आता हे दोन्ही कडील नेते मंडळी एकत्र बसून कोणा एकाच्या नावावर शिक्का मोर्तब करतील. पण, संजीवराजे नाईक निंबाळकर (Sanjivraje Naik Nimbalkar) हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असल्याने त्यांना पक्ष व पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. माढामधून उमेदवारीसाठी अजित पवारांची साथ सोडून ते तुतारी हाती घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर माढा लोकसभा मतदारसंघात सोलापूरच्या भागात धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना तुतारीची उमेदवारी जाहीर झाल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, सातारा लोकसभेबाबत (Satara Loksabha) बोलताना खासदार शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण तुतारीच्या चिन्हावर सातारा लोकसभा लढण्यास तयार असतील, तर त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो, असे स्पष्ट केले आहे. सध्या तरी पृथ्वीराज चव्हाण यांच्या होकारावर सर्व काही अवलंबून आहे. त्यांनी नकार दिल्यास शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचा पर्याय राष्ट्रवादीकडे राहणार आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Madha Loksabha Election
Sangli LokSabha constituency : 'सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची' विशाल पाटलांचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com