Lok Sabha Election 2024 : ठाकरे कोल्हापूरच्या जागेवर ठाम; आघाडीत चर्चा मात्र एकाच नावाची...

Shiv Sena News : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसून कोल्हापूरच्या जागेचा वाद सुरूच आहे. ठाकरे गट या जागेसाठी आग्रही आहे.
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या दौऱ्यापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या उमेदवारीचे नाव पुढे येत आहे. पण ही जागा कोणाला जाणार, याबद्दल उत्सुकता लागून राहिली असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या जागेसाठी प्रचंड आग्रही आहेत. नुकतेच शरद पवार यांनी 48 जागांचा तिढा सुटला असल्याचे सांगत 2-3 जागांवर पेच कायम असल्याचे सांगितले होते. त्यात कोल्हापूरच्या जागेचा समावेश आहे. त्यामुळे या जागेवरून आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उमेदवार सर्वमान्य द्या पण जागा मात्र आपल्याच पक्षाला हवी यावर ठाकरे ठाम असल्याने जागावाटपासह उमेदवारीचाही निर्णय लांबण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेस (Congress) एकसंघ असेपर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व होते. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून 2009 चा अपवाद वगळता 2019 पर्यंत राष्ट्रवादीचे या मतदारसंघावर वर्चस्व राहीले आहे. या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून ही जागा मागितली जात आहे. पण त्यांच्याकडे ताकदीचा उमेदवार नाही आणि या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे तीन विधानसभेचे व दोन विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेस या मतदारसंघात भक्कम असल्याचे सांगत काँग्रेसला ही जागा देऊन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना सर्वमान्य उमेदवार म्हणून उभा करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Satara Politics : आमदार गोरेंचं ठरलं! फलटणमध्ये जाऊन रामराजेंना भिडणार

2019 च्या निवडणुकीत या मतदारसंघातून ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा खासदार निवडून आला. या जोरावरच ठाकरे याच मतदारसंघासाठी आग्रही आहेत. उमेदवार नंतर ठरवू पण जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडा, अशी त्यांची भूमिका असल्याचे समजते. दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले खासदार शरद पवार यांनीही शाहू महाराज यांना उमेदवारी देण्याची लोकांची मागणी असेल तर आघाडीतील इतर पक्षांतील नेत्यांशी चर्चा करू, असे सांगितले आहे. पण त्याचवेळी त्यांनी शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालवतात, त्यांना राजकारणात रस नसल्याचे सांगून वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, येत्या दोन दिवसांत पवार यांच्यासह उद्धव ठाकरे व काँग्रेस नेत्यांची बैठक मुंबईत होणार आहे. त्यात जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जागांची अदलाबदल शक्य

ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी कोल्हापूरऐवजी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला येणारी राज्यातील अन्य एखादी जागा ठाकरे यांना देऊन त्या बदल्यात कोल्हापूरची जागा बदलण्याचीही शक्यता आहे. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर शहरची जागा राष्ट्रवादीकडे होती. माजी आमदार मालोजारीजे त्यांचे उमेदवारही निश्‍चित होते, पण ऐनवेळी ही जागा काँग्रेसला देऊन मालोजीराजे यांनाच उमेदवारी दिली. हाच पॅटर्न या निवडणुकीत राबवला जाईल, अशी शक्यता आहे.

दावा ठाम, अडचण कायम अन् इच्छुकही गोत्यात

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे गेल्यास जवळपास छत्रपती घराण्यातीलच नाव निश्चित झाले आहे. छत्रपती घराण्यातून माझी खासदार संभाजी राजे छत्रपती किंवा शाहू महाराज छत्रपती यांचे नाव काँग्रेसकडून निश्चित होऊ शकते, तर दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या मतदारसंघावर दावा कायम ठेवला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विचार केला जवळपास पाच मतदारसंघांत केवळ एका जागेची मागणी केल्याचे समजते. शिवसेना वाटेची एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी राखीव ठेवली असल्याचे सांगितले जाते. या तिन्ही जिल्ह्यांत शिवसेना ठाकरे गटाकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ सोडला तर उर्वरित ठिकाणी शिवसेना ठाकरे गट कुमकवत झाला आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांवरील वा साहजिकच सोडेल असे नाही. या सर्व गोष्टीमुळे ठाकरे आणि काँग्रेसमधील इच्छुकांची अडचण कायम आहे.

(Edited By - Rajanand More)

R

Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole
Solapur Shivsena : शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख अडचणीत; वाहन विक्रेत्याच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com