Solapur Shivsena : शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख अडचणीत; वाहन विक्रेत्याच्या फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

Shivsena Eknath Shinde Group : मुनगापाटील हे पुणे-मुंबईतून गाड्या आणून सोलापूर येथे विक्री करण्याचे काम करतात.
Manish Kalje
Manish KaljeSarkarnama
Published on
Updated on

Solapur News : वाहन विक्रेत्याकडून चारचाकी खरेदी करून ठरल्याप्रमाणे पैसे न देता दमबाजी केल्याप्रकरणी शिवसेनेचे शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख आणि त्यांच्या एका साथीदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित वाहन विक्रेत्याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. (Solapur Political News)

जुन्या वाहनाचे खरेददार-विक्रेते विठ्ठल दत्तात्रेय मुनगापाटील यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या विरोधात फिर्याद दिली होती. फिर्यादी विठ्ठल मुनगापाटील हे जुन्या चारचाकी गाडीचे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. मुनगापाटील हे पुणे-मुंबईतून गाड्या आणून सोलापूर येथे विक्री करण्याचे काम करतात. (Solapur Shivsena )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Manish Kalje
Shriniwas Patil : कलेक्टरपदाचा राजीनामा देऊन पृथ्वीराजबाबांना चितपट करणारे : श्रीनिवास पाटील

फिर्यादीच्या ओळखीचे आकाश मुदगल यांनी मनीष काळजे यांना चारचाकी गाडी घ्यावयाची आहे, असे मुनगापाटील यांना 4 जानेवारी 2024 रोजी सांगितले. त्यावेळी मुनगापाटील यांनी त्यांच्याकडील चारचाकी गाडी (एमच ०४, एफएन 7878) मनीष काळजे आणि मुदगल यांना दाखवली. (Manish Kalje News)

मनिष काळजे यांना ती गाडी पसंत पडली. त्या गाडीची किंमत चार लाख रुपये देण्याचे ठरले होते. काळजे यांनी त्यातील एक लाख रुपये ॲडव्हान्स दिला होता, उर्वरीत तीन लाख रुपये दोन दिवसांत देतो, असे सांगून चारचाकी घेऊन गेले. काळजे हे आता स्वतः ती मोटार वापरत आहेत.

Manish Kalje
Ashok Chavan Nanded Daura : भाजप प्रवेशानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच नांदेड दौऱ्यावर; आता कळणार खरी ताकद

वाहन विक्रेते मुनगापाटील यांनी चारचाकी गाडीचे उर्वरीत तीन लाख रुपये काळजे यांच्याकडे मागितले. मात्र पैसे तर दिले नाहीत. या उलट मुनगापाटील यांना दमदाटी करण्यात आली. त्यानंतर मुनगापाटील यांनी काळजे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार काळजे आणि आकाश मुदगल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Manish Kalje
Beed Politics : पवारांच्या पक्षातील नेत्याची कार अज्ञातांनी पेट्रोल टाकून जाळली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com