Lok Sabha Election 2024 : पोरांच्या उमेदवारीसाठी उतारवयात 'बापमाणसं' मुंबईत ठाण मांडून; कोणाला मिळणार यश?

Satara Lok Sabha Constituency : मुंबइतील सिझन फोर हॉटेलमध्ये बुधवारी सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी बैठक झाली.
vikramsingh patankar satyajeet patankar sarang patil shrinivas patil
vikramsingh patankar satyajeet patankar sarang patil shrinivas patilsarkarnama
Published on
Updated on

राजकारणात आपला गट शाबूत राहण्यासाठी आणि उत्तराधिकारी, वारसदार याच्या भविष्यासाठी आगामी लोकसभेतून उमेदवारी मिळविण्यासाठी दोन बापाची धडपड सुरू आहे. सातारा लोकसभा मतदार संघातून ( Satara Lok Sabha Constituency ) उमेदवार कोण यांचा मेळ अजून बसत नसला तरी आपल्या पोराला उमेदवारी मिळावी, यासाठी उतारवयात दोन बापमाणसं मुंबईत ठाण मांडून आहेत. पुढील दोन- तीन दिवसात लोकसभेची उमेदवारी जाहीर होणार असल्याने वयाची 80 पार केलेली राजकारणातील मातब्बर दोघांनी आपल्या पोरांसाठी फिल्डिंग लावली आहे. आता त्यात कोण बाजी मारणार हे लवकरच समजेल. 

vikramsingh patankar satyajeet patankar sarang patil shrinivas patil
Eknath Shinde News : अखेर ठरलं! मुख्यमंत्री 'या' दिवशी जयंतरावांच्या बालेकिल्ल्यात; महायुतीकडून कोंडी करण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक होत आहे. सातारा लोकसभा ( Satara Lok Sabha ) राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला असला तरी आता ताकद विभागली असल्याने विजयी रथ रोखण्यासाठी महायुती विशेषकरून भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. महायुतीकडून सातारा मतदार संघ आणि उमेदवार याबाबत कमालीची गोपनीयता ठेवत ऐन वेळेला पत्ते खोलण्याची किमया केली जाण्याची शक्यता आहे. शरद पवारांना शह देण्यासाठी आणि बालेकिल्ला उध्दवस्त करण्यासाठी महायुतीतील प्रामुख्याने भाजपने काही डाव रचलेले असून ते खेळलेले नाहीत. उमेदवार फॅक्टर हाच विजयाचा रथ कोणाकडे ठरवणार असल्याने महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) आणि महायुती एकमेकांचा अंदाज घेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबइतील सिझन फोर हॉटेलमध्ये बुधवारी ( 6 मार्च ) सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी बैठक झाली. या बैठकीसाठी खुद्द शरद पवारांनी ( Sharad Pawar ) हेलिकॉप्टर पाठवून इच्छुकांसह नेत्यांशी चर्चा केली. यावेळी सातारा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील ( Shrinivas Patil ) हे आपले चिरंजीव सारंग पाटील ( Sarang Patil ) यांच्यासाठी तर माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर ( Vikramsingh Patankar ) हे त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर ( Satyajeet Patankar ) यांच्यासाठी आग्रही आहेत. दोघांचेही वय 80 च्या पुढे असताना आपले वारसदार राजकारणात स्थिर व्हावेत, यासाठी ठाण मांडून आहेत. तेव्हा आता उतारवयात नक्की कोणत्या बापमाणसाला यात यश मिळते, हे लवकरच समजेल. 

vikramsingh patankar satyajeet patankar sarang patil shrinivas patil
Lok Sabha Elections 2024: लोकसभेसाठी मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! 'हे' आहेत संभाव्य उमेदवार

महायुतीत तयारी सुरू पण मतदार संघ कोणाचा

महायुतीतून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गेल्या महिना-दीड महिन्यापासून तयारीला सुरूवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या पुरूषोत्तम जाधव यांनाही आपण रिंगणात असणारच या इराद्याने शड्डू ठोकला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटील यांचे नाव जवळपास निश्चित आहे. अशी परिस्थिती महायुतीत असताना अद्याप नक्की भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यापैकी कोणाला मतदार संघ जाणार हेच निश्चित नाही. त्यामुळे ऐनवेळेला कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण बंडखोरी करणार यावर विजयची बरीच गणित आवलंबून आहेत. तर महाविकास आघाडीही महायुतीत कोणाला मतदार संघ सुटणार यावर उमेदवार ठरवेल, असे सध्यातरी दिसत आहे.

vikramsingh patankar satyajeet patankar sarang patil shrinivas patil
Ramdas Kadam: माझेही नाव रामदास कदम आहे...; भाजपला सज्जड दम; निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीत वादाची ठिणगी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com