Lok Sabha Election 2024 : सट्टाबाजारातही लोकसभेचं वारं, निवडून येणाऱ्या उमेदवारांवर लाखोंच्या खेळी

Hatkanagale, Kolhpaur Loksabha Constituency : हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात पार पडलं.
 shahu maharaj sanjay mandlik dhairyashil mane raju shetti
shahu maharaj sanjay mandlik dhairyashil mane raju shetti sarkarnama

Kolhapur News, 20 May : लोकसभेचे ( Lok Sabha Election 2024 ) मतदान पार पडल्यानंतर 4 जून रोजी होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. उमेदवार, पक्षातील वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या नजरा या निकालाकडे लागल्या आहेत. सट्टा बाजारातही लोकसभेचा विजयी उमेदवार कोण असणार? याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे. निवडून येणाऱ्या उमेदवारांवर कार्यकर्ते पैजा लावत असतानाच हजार रूपये पासून लाख रूपयेपर्यंत सट्टा लावण्यात येत आहे. त्यामुळे उलाढाल वाढली असून सटेट्बाजांना 4 जूनची ओढ लागली आहे.

हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतदान महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी पार पडलं. एकूण सात टप्प्याचे मतदान झाल्यानंतर देशातील संपूर्ण लोकसभेचा निकाल 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जनतेने कौल कोणाला दिला आहे? याबाबत उत्सुकता लागली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 27 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महायुतीचे खासदार धैर्यशील माने ( Dhaiysheel Mane ), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी ( Raju Shetti ) आणि महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांच्यात आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत वंचितच्या मत विभाजन फॅक्टरमुळे राजू शेट्टी यांना पराभवाचा फटका बसला होता. मात्र, त्यावेळी मुस्लिम चेहरा असल्याने दलित आणि मुस्लिम समाजाची मते वंचितच्या पारड्यात पडली होती. मात्र, यंदा वंचित किती मते घेणार? यावर बरेच गणिते अवलंबून आहेत.

 shahu maharaj sanjay mandlik dhairyashil mane raju shetti
Kolhapur Politics : लोकसभेत एकी, पण विधानसभेचं काय? कोल्हापुरातील सहा जागांसाठी 'असं' असणार गणित..

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 23 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यात झाली. पूर्वजांच्या कामगिरीवरच ही लढत अधिक रंगतदार पाहायला मिळाली. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेचा निकाल काय लागणार? याकडे देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे. या दोन्ही मतदारसंघात कोण उमेदवार निवडून येणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात असून कार्यकर्त्यांमध्ये हजारांपासून ते लाख रूपयांपर्यंत पैजा लावल्या आहेत. तर सट्टा बाजारात देखील विजयाची खात्री असलेल्या उमेदवारांनाच ज्यादा बोलू लागल्याचे सांगितले जाते. वास्तविक पाहता 18 दिवस झाले तरी मतदानाची नेमकी आकडेवारी किती हे अद्याप समोर आलं नाही. त्यामुळे अनेकांना निकालाचा नेमका अंदाज बांधता येईना.


( Edited By : Akshay Sabale )

 shahu maharaj sanjay mandlik dhairyashil mane raju shetti
Kolhapur Lok Sabha Election : तीन उमेदवारांचा खर्च अर्धा कोटींवर, अंतिम तपासणीत धैर्यशील माने आघाडीवर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com