Kolhapur Politics : लोकसभेत एकी, पण विधानसभेचं काय? कोल्हापुरातील सहा जागांसाठी 'असं' असणार गणित..

Kolhapur Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत महाविकास आणि महायुती म्हणून एकत्र आलेल्या नेत्यांना या पाहिले असेल. मात्र चार विधानसभा मतदारसंघात याच्या उलट वारे वाहणार असल्याचे दिसून येत आहे.
Kolhapur Lok Sabha Constituency
Kolhapur Lok Sabha ConstituencySarkarnama

Kolhapur Political News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभेतील राजकीय गणिते जुळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी विशेष लक्ष घातले होते. आता यात कोण यशस्वी ठरणार हे, 4 जूनला स्पष्ट होईल. या निवडणुकीसाठी युती आणि आघाडीला साथ देणाऱ्या नेत्यांनी आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवली होती. त्यामुळे लोकसभेची गणिते विधानसभेत त्यांच्या पथ्यावर पडणार की नाही, याबाबत कोल्हापुरात चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आणि महायुती म्हणून एकत्र आलेल्या नेत्यांना या पाहिले असेल. मात्र चार विधानसभा मतदारसंघात याच्या उलट वारे वाहणार असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा स्वतंत्र लढण्याचा निर्णय झाल्यास कोल्हापूर उत्तर, राधानगरी कागल आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीची घडी फिस्कटणार हे नक्की आहे. शिवाय कोल्हापूर उत्तर हा महाविकास आघाडीमध्ये वादाची किनार ठरणार आहे. पण एकत्र लढण्याचा निर्णय झाल्यास बंडखोरी अटळ मानली जाते.

कोल्हापूर उत्तर मध्ये महायुतीकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे सत्यजित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, खासदार धनंजय महाडिक Dhananjay Mahadik, राष्ट्रवादीचे आदिल फरास यांनी लोकसभेत आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली होती. तर महाविकास आघाडी कडून आमदार जयश्रीताई जाधव, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे आर. के. पवार, जिल्हाध्यक्ष व्ही. व्ही. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, रविकिरण इंगवले यांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती. मात्र विधानसभा निवडणुकीला महायुतीतील या जागेंवर भाजपचा दावा आहे.

Kolhapur Lok Sabha Constituency
Ravindra Dhangekar News : आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह 35 ते 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल !

पोटनिवडणुकीत एकट्या भाजपने 78 हजार मते घेतली आहेत. शिवाय त्यावेळी शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने ही जागा काँग्रेसकडे गेली. त्यातच राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष शिंदे गटात गेल्याने त्यांनीही महायुतीतून या जागेवर आपला दावा कायम ठेवला आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटातच रसिकेच असणार आहे. काँग्रेसकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे. डॉ.चेतन नरके Chetan Narke यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. तर ठाकरे गटाचे संजय पवार ही कोल्हापूर मधून इच्छुक आहेत. त्यामुळे महायतीत आणि महाविकास आघाडीत या जागेवरून रस्सीखेच पाहायला मिळेल.

Kolhapur Lok Sabha Constituency
Dhairyasheel Mohite Patil News : 'आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती'; धैर्यशील मोहिते-पाटलांचा निंबाळकरांवर हल्लाबोल

कोल्हापूर दक्षिणमधील निवडणूक दोघांसाठीही सध्या तरी त्रासदायक नाही. महायुतीकडून भाजपचे माजी आमदार अमल महाडिक Amal Mahadik आणि काँग्रेसकडून ऋतुराज पाटील यांच्यातच लढत होण्याची संकेत आहे. मात्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दक्षिणमध्ये केलेली घुसखोरी त्याला अपवाद ठरू शकते. करवीर विधानसभा मतदारसंघात पारंपरिक विरोधक काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यात लढत निश्चित मानली जाते. मात्र या मतदारसंघात भाजपने वाढवलेली ताकद तितकीच महत्त्वाची आहे. महायुती आणि महाविकास म्हणून लढल्यास या मतदारसंघात अंतर्गत चढाओढ पाहायला मिळणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर Prakash Abitkar आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी आमदार के. पी. पाटील यांच्यातच विधानसभेला तुल्यबळ लढत होण्याची संकेत आहेत. बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त आबिटकर आणि पाटील यांच्या गटातील संघर्ष टोकाचा झाला आहे. शिवाय काँग्रेसचे नेते सतेज पाटील या गटाने के. पी. पाटील यांना केलेली मदत सर्वश्रुत आहे. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत पाटील विरुद्ध आबिटकर अशी होईल. पण ए. वाय. पाटील यांची काँग्रेससोबत जमलेली गट्टी माजी आमदार के. पी पाटील यांची डोकेदुखी वाढवू शकते.

चंदगड विधानसभा मतदारसंघातही महायुतीतील पक्षाच्या नेत्यांची भाऊगर्दी आहे. राष्ट्रवादी अजित पवार Ajit Pawar गटाचे आमदार आणि खासदार संजय मंडलिक यांचे मेव्हणे राजेश पाटील, भाजपचे शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक चराटी, संग्रामसिंह कुपेकर, भरमूआण्णा पाटील यांच्यात रस्सीखेच असणार आहे. मागील विधानसभेत शिवाजी पाटील यांनी बंडखोरी केली. त्याचा फायदा राजेश पाटील यांना झाला. भाजपचे अशोक चराटी तिसऱ्या क्रमांकावर राहिले. महाविकास आघाडीकडे अप्पी पाटीलहा चेहरा आहे. काँग्रेसकडून त्यांना रसद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते.

सर्वाधिक चर्चेचा विषय ठरतो तो म्हणजे कागल विधानसभा मतदारसंघ. येथे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे केवळ माजी आमदार संजय घाटगे यांना सोडले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे चेहरा नाही. तर जनता दलातून स्वाती कोरे यांचे नाव पुढे येऊ शकते. महायुतीत मांडीला मांडी लावून संजय मंडलिक Sanjay Mandlik यांचा प्रचार करणारे राजकीय वैरी पुन्हा एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राजें समरजित घाटगे यांच्यात लढत निश्चित मानली जाते. महायुतीत ही लढत एकत्र झाल्यास घाटगे याची बंडखोरी अटळ आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Kolhapur Lok Sabha Constituency
Lok Sabha Election 2024: कुणीही आले तर काय... या भावनेतून तर मतदानाचा टक्का घसरत नाही ना?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com