Karad voting News : लोकशाहीचा उत्सव दर पाच वर्षांनी साजरा होतो, त्यावर एक गडद छाया यावेळी आहे. या देशात लोकशाही अस्तित्वात राहील का नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल थांबवण्यासाठी आज देशात देशातील जनता सज्ज झाली आहे. मला खात्री आहे की, जनता इंडिया आघाडीला साथ देऊन आणि देशात सत्तांतर होईल याची मला खात्री आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी कराड येथील नगरपालिका शाळेत आज मंगळवारी कुटुंबियासमवेत मतदान केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांची संवाद साधला. आमदार चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी कुठे दहशत, आमिषे, कुठे पद देतो, कर्ज देतो असे अमिषे दाखवली असली तरी या विरोधी पक्षाच्या खासदाराला तीन वेळा यापूर्वी जनतेने निवडून दिलेले आहे. त्यांची बारा वर्षाची कारकीर्द लोकांच्या समोर आहे. त्यामुळे मागच्यापेक्षा या वेळेला सातारा लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा उमेदवार जास्त मताधिक्याने निवडून येईल. (Lok Sabha Elections 2024 update)
भाजपने (BJP) कॅशलेस करप्शन केले आहे, त्यामुळे त्यांना नोटांची गरज भासत नाही. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून नोटांशिवाय करप्शन करण्याचा विक्रम भाजपने केला आहे. त्यामुळे त्यांना नोटांची गरज आता भासत नाही. पूर्वी भासत होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर परखड मत मांडले असल्याची टीका चव्हाण यांनी केली. (Latest Political News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपला सत्तेत राहण्याची संधी सध्या मिळणार नाही. देशात सत्तांतर होणार आहे. आम्ही भाजपचे अटल बिहारी वाजपेयी यांचे यापूर्वीचे सरकार बघितलेले आहे. सत्ता मिळवण्यासाठी काहीही करावे लागले तरी ते करायचे, असा प्रयत्न नरेंद्र मोदी यांच्याकडून सुरू आहे. मात्र, जनता त्याला साथ देणार नाही, असे चव्हाण म्हणाले.
बारामतीत मोदींचे बॅनरवरील फोटो हटवावे लागले...
नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या संदर्भात जी वाक्य वापरली ती वापरायला नको होती. अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप केले. बारामतीमध्ये लावलेले पंतप्रधानांचे फोटो असलेले बॅनर अजित पवारांना काढावे लागले. मोदींकडून खालच्या पातळीवर झालेला प्रचार महाराष्ट्रातील जनतेला रुचलेला नाही. नरेंद्र मोदींना आता पराभव स्पष्ट दिसत आहे.
कराड दक्षिणमध्ये पैशांचा भाजपकडून वापर
सातारा लोकसभा मतदारसंघात विशेषत: कराड दक्षिणमध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, असा आरोप करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, त्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या हेल्पलाइनवर तक्रार केली आहे. मोदींच्या सभेला पैसे देऊन माणसं आणली होती. भाजपकडून सत्तेत राहण्यासाठी पैशाचा वापर केला जात आहे. मात्र, जनता त्याला साथ देणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.