Lok Sabha Election 2024 Voting Live : खोडशीत ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; काय आहे कारण?

Boycott on Voting : खोडशी गावाच्या हद्दीतील शासकीय गायरान जमिनीवरील प्लॉट धारकांना प्लॉट वाटप केले जात नाही, या मुद्द्यावर मतदानावर बहिष्कार कायम आहे.
Boycoot on Voting
Boycoot on VotingSarkarnama

Karad News : कराड (जि. सातारा) तालुक्यातील खोडशी गावातील ग्रामस्थांनी मतदानादिवशीही मतदानावरील बहिष्कार कायम ठेवला आहे. प्रशासनाने दिलेला प्रस्ताव धुडकावत खोडशी गावाच्या हद्दीतील शासकीय गायरान जमिनीवरील प्लॉट धारकांना प्लॉट वाटप केले जात नाही, या मुद्द्यावर मतदानावर बहिष्कार कायम आहे. (Lok Sabha Election 2024 Voting Live)

खोडशीतील (Khodshi Village) शासकीय जमिनीवर अतिक्रमण प्रश्न प्रशासकीय यंत्रणेने सोडविण्यापेक्षा त्याचा गुंता वाढवला आहे. याच जमिनीवर वास्तव्य करणाऱ्यांना प्लॉट वाटप करण्याची चालढकल केली जात आहे.यावरुन ग्रामसभेतही चर्चा झाली होती. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला आहे. (Boycott on Voting)

Boycoot on Voting
Rohit Pawar News : मतदान केल्यानंतर रोहित पवारांचा अजितदादांवर मोठा आरोप; म्हणाले...

प्रशासकीय यंत्रणा सहकार्य करत नाही, असा आरोप करत तेथील काही ग्रामस्थांनी सामाजिक ऐक्य जोपासणाऱ्या खोडशी गावात प्लॉट वाटप हा प्रश्न निकाली निघाला की हेच ऐक्य अधिक वाढणार आहे, असे म्हटले आहे. (Latest Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संबंधित प्लॉट वाटप व्हावे, अशी मागणी करुन लोकसभेच्या निवडणुकीत मतदानावर (Voting) ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय ग्रामस्थांनी कायम ठेवला आहे. हे गाव सातारा लोकसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघात महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे आणि महायुतीचे उदयनराजे भोसले रिंगणात आहेत. (Lok Sabha Election 2024)

Boycoot on Voting
Lok Sabha Election 2024 Voting Live : जनता इंडिया आघाडीला साथ देईल, देशात सत्तांतर होणार; पृथ्वीराज चव्हाण यांना विश्वास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com