Lok Sabha Election : निवडणुकीआधीच कोल्हापुरात जुंपली, रिचेबल-नॉट रिचेबलचा मुद्दा गाजणार

Kolhapur Lok Sabha Constituency Chetan Narke: लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून शिंदे गटाच्या खासदारावर इच्छुकाचा निशाणा...
Chetan Narke, Sanjay Mandlik
Chetan Narke, Sanjay Mandlik Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics News : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत 'नॉट रिचेबल'चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्यावर सातत्याने नॉट रिचेबल असल्याचा आरोप होत आला आहे. तरीही 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मंडलिक यांनी विजय खेचून आणला. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा हा मुद्दा गाजणार असल्याचे संकेत आहेत. नुकताच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक उमेदवाराने 'रिचेबल'चा उल्लेख केल्याने त्याची चर्चा जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात सुरु झाली आहे. त्याचबरोबर लोकसभेसाठीच्या इच्छुक उमेदवाराने काजू बोर्डाच्या श्रेयासाठीही दावा केल्यामुळे कोल्हापूर लोकसभेची निवडणूक चुरशीची होणार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार झडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

Chetan Narke, Sanjay Mandlik
Lok Sabha Election : शिंदे गटात अस्वस्थता! भाजपच्या दाव्याने जिल्ह्यातले राजकारण फिरणार

'गोकुळ'चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी महाविकास आघाडीकडे तिकिटाची मागणी केली असून, ते कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. कोल्हापूर प्रेस क्लबमधील पत्रकार परिषदेत त्यांनी दोन मोठे दावे करून खळबळ उडवून दिली आहे. मी कोल्हापूरचा रिचेबल खासदार होण्याचा प्रयत्न करेन, असे वक्तव्य करून त्यांनी थेट मंडलिक यांना टोला लगावला आहे. कोल्हापूरच्या लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा संजय मंडलिक यांच्यावर नॉट रिचेबलचा आरोप झाला. २०१९ च्या निवडणुकीत मंडलिक यांनी विजय अक्षरश: खेचून आणला होता. आताही ज्या जागांवर शिवसेनेचे खासदार आहेत, त्या जागांवर शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे संजय मंडलिक यांचा या जागेवर प्रथम दावा आहे.

आपण लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून, घरोघरी प्रचार सुरू केला आहे. जवळपास एक हजार २५५ गावांचा दौरा पूर्ण केल्याचा दावा डॉ. चेतन नरके यांनी केला आहे. म्हणजेच आपण रिचेबल असून, भविष्यातही आपण रिचेबल राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. हे कमी म्हणून की काय चंदगडचा काजू बोर्ड माझ्या पाठपुराव्यामुळे मिळाल्याचाही दावा डॉ. नरके यांनी केला आहे. यावरून भविष्यात संजय मंडलिक आणि डॉ. नरके यांच्या जुंपण्याची शक्यता आहे.

काजू बोर्ड अन् वादाची ठिणगी

राज्यातील काजू फळाच्या विकासाकरिता राज्य सरकारने १६ मे २०२३ रोजी जीआर काढून महाराष्ट्र राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय रत्नागिरी, सिंधुदुर्गसोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नातून या बोर्डाला मंजुरी मिळाल्याचा दावा केला जातो, पण या श्रेयाच्या लढाईत आता

डॉ. चेतन नरके यांनीही उडी घेतली आहे. चंदगडचा काजू बोर्ड माझ्या पाठपुराव्यामुळे यशस्वी झाल्याचा दावा केला आहे. यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये माझाही समावेश आहे आणि पाठपुराव्याचे लेखी पुरावे उपलब्ध असल्याचाही दावा डॉ. नरके यांनी केला आहे.

Edited By Avinash Chandane

Chetan Narke, Sanjay Mandlik
Raju Shetti : लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका .. राजू शेट्टी यांच्यासह 150 जणांवर गुन्हा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com