Lok Sabha Election News : समर्थकांचा वाढता दबाव; मोहिते पाटील 'तुतारी' हाती घेणार का?

Madha Lok Sabha Political News : सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असल्याने वातावरण तापले आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला आहे.
Dhairyasheel Mohite Patil-Jayshinh Mohite Patil
Dhairyasheel Mohite Patil-Jayshinh Mohite PatilSarkarnama
Published on
Updated on

प्रमोद बोडके

Solapur News : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे लागले आहे. महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यातच सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असल्याने वातावरण तापले आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला आहे.

माढा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने धैर्यशील मोहिते पाटील समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. माढ्यातून निवडणूक लढविण्याचे धाडस करा, भाजप उमेदवार बदलत नसेल तर धैर्यशील मोहिते पाटील यांना उभे करून शरद पवारांची तुतारी हाती घ्या, असा प्रचंड दबाव समर्थकांनी मोहिते पाटील यांच्यावर आणला आहे. त्यासोबतच 'माढा अन् निंबाळकर यांना पाडा' अशी घोषणाबाजी करीत मोहिते पाटील समर्थकांनी रान पेटवले आहे. (Lok Sabha Election News)

Dhairyasheel Mohite Patil-Jayshinh Mohite Patil
Vijay Shivtare On Ajit Pawar : अजित पवारांविरोधात आक्रमक झालेल्या शिवतारेंना ‘इंदापूर पॅटर्न’चा धसका...

लोकसभा उमेदवारी देताना भाजपने मोहिते पाटील यांना डावलले आहे. मोहिते पाटील समर्थक नाराज आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या साखर कारखान्यांना केलेली मदत, मोहिते पाटलांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थांची सुरू असलेली चौकशी व इतर प्रकरणे पाहता भाजपसारख्या महाशक्तीच्या विरोधात जाऊन निवडणूक लढविण्याचे धाडस मोहिते पाटील करणार का? याबद्दल आजही स्पष्टता दिसत नाही.

शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच उमेदवारीबाबत डावपेच आखल्याचे दिसते. या मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक असल्याने माढ्यातून महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरुवातीपासूनच आहे. मंत्री म्हणून काम करताना मतदारसंघात झालेली निराशा, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाविरोधात झालेल्या ओबीसी मेळाव्यात उघड घेतलेली भूमिका या बाबी जानकर यांच्यासाठी अडचणीच्या ठरू शकतात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. अनिकेत देशमुखांचेही नाव

सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांच्या नावाबद्दलही चाचणी सुरू आहे. गणपतराव देशमुख यांचे ऋणानुबंध सोलापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसोबत होते. या ऋणानुबंधाचा व माढा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या धनगर समाजाच्या मतांचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (शरदचंद्र पवार) होण्याची दाट शक्यता आहे.

मोहिते, निंबाळकर व जयंत पाटलांना निर्णय घेण्याचे अधिकार

भाजपने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील समर्थक व विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर समर्थकांच्या नाराजीचा भडका उडाला आहे. रामराजे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांचा व शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये नुकतीच बैठक झाली. माढा मतदारसंघातील उमेदवारी व भूमिका यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार मोहिते, निंबाळकर व जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत.

करमाळा तालुक्यातून गाठीभेटींना सुरुवात

उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या ‘सागर’ बंगल्यावर बुधवारी माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी व नाराजी याबद्दल खलबते सुरू होती. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीदेखील अकलूजमध्ये हजेरी लावली होती. मोहिते पाटील समर्थकांची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यापर्यंत पोचविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. माढ्यातील उमेदवारीचा तिढा असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा तालुक्यातून गाठीभेटींना सुरुवात केली आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Dhairyasheel Mohite Patil-Jayshinh Mohite Patil
Madha Loksabha Election 2024 : खासदार निंबाळकरांचा स्वीय सहायक रामराजेंच्या गळाला; माढ्यात चुरस वाढणार?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com