New Delhi : मोदी सरकारचं महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या'वंदे भारत'ने देशात रेल्वेला गतिमान केले आहे.रेल्वे मंत्रालयाकडून भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत.त्यातवंदे भारतला दिवसेंदिवस प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळतो आहे.अनेक राज्यांनी वंदे भारतची मागणी केली आहे. महाराष्ट्रातही वंदे भारत लोकप्रिय झाली आहे. आता मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत सुरु होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचवरुन साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वंदे भारत एक्सप्रेस 17 डिसेंबरपासून मुंबई ते कोल्हापूर वंदे भारत सुरू होत आहे अशी माहिती मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीनिवास पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे या रेल्वेला कराड आणि सांगली या दोन महत्वाच्या रेल्वेस्थानकांवर थांबा मिळावा, अशी मागणी केली आहे.
मुंबई ते कोल्हापूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू करावी,अशी मागणी यापूर्वीपासून होत होती. ही रेल्वे येत्या 17 डिसेंबरला सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे.या रेल्वेमार्गावर कराड हे पुणे विभागात रेल्वेला दुसऱया क्रमांकाचे उत्पन्न मिळवून देणारे रेल्वेस्थानक आहे.त्यामुळे या रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेसला थांबा मिळावा,यासाठी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य गोपाल तिवारी हे गेल्या काही महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत.ही रेल्वे सुरू होणार असल्याने त्यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे मागणी केली होती.
खासदार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी कराड परिसरातील रेल्वे प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना 12 डिसेंबरला पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून 17 डिसेंबर रोजी मुंबई-कोल्हापूर या वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्घाटन होणार असल्याचे माहिती मिळत आहे. या गाडीला सांगली आणि कराड स्थानकांवर थांबा देण्यात आला नाही. कोल्हापूरनंतर कराड आणि सांगली ही दोन महत्वाची रेल्वे स्थानके आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईला जाण्यासाठी सर्वाधिक लोक कराड आणि सांगली या स्थानकांवरून बुकिंग करतात. पर्यायाने या स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटना करीत आहे. मी यापूर्वीच आपणास पत्र लिहून तशी मागणी केली आहे. याची दखल घेऊन या गाडीला सांगली आणि कराड या दोन्ही ठिकाणी थांबा देण्याबाबत सूचना रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.