Rahul Aawade Raju Shetty, Dhairyasheel Mane, Sanjay Mandlik
Rahul Aawade Raju Shetty, Dhairyasheel Mane, Sanjay MandlikSarkarnama

Mahayuti News : हातकणंगलेत महायुतीचे जुळता जुळेना; इचलकरंजीत आवाडे लागले तयारीला...

Ichalkaranji : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची तयारी...
Published on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळतील, असे विधान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले, तर अब्दुल सत्तार हातकणंगलेची जागा ही शिवसेनेकडेच राहील, असे पुण्यातून कडाडले. त्यात भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार यांनादेखील फोनवरून ऑफर दिल्याची माहिती आहे, तर विद्यमान खासदारांचे अजूनही असेलेले मौन आणि इचलकरंजीत आवाडे पितापुत्रांची सुरू असलेली लगबग, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण, यावरून सुंदोपसुंदी सुरू असल्याचे दिसते.

जिल्ह्यातील लोकसभेच्या (LokSabha) दोन जागेवरून भाजपच्या (BJP) गोटात हालचालींना वेग आला आहे. दोन्हीपैकी एक मतदारसंघ घेण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. कोणत्याही एका मतदारसंघात कमळाच्या चिन्हावर लढण्यासाठी पक्ष आणि वरिष्ठ आग्रही आहेत. सद्यःस्थितीत भाजपच्या सर्व्हेत शिवसेना (ShivSena) शिंदे गटाचे दोन्ही विद्यमान खासदार धोक्यात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या ठिकाणी आहे तेच राहणार की? कमळाच्या चिन्हावर विद्यमान निवडणुकीच्या रिंगणात उतरणार किंवा उमेदवार बदलणार हे कळायला मार्ग नाही. पण भाजपकडून कोल्हापुरातून धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik), शौमिका महाडिक, तर हातकणंगलेतून राहुल आवाडे (Rahul Awade), सुरेश हाळवणकर यांच्या नावाची चर्चा आहे.

Rahul Aawade Raju Shetty, Dhairyasheel Mane, Sanjay Mandlik
RAY Nagar : 'आडममास्तरांनी आमच्या आयुष्याचं सोनं केलं, आता आम्ही त्यांना...' : लाभार्थींनी व्यक्त केल्या भावना!

विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्याबाबत जनतेत नकारात्मक मते असल्याच्या भावना भाजपनेत्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांनी पर्यायी उमेदवारांची शोध घेण्याची मोहीम सुरू केली. यातूनच हातकणंगलेतून राहुल आवाडे यांचे नाव पुढे आल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आवाडे यांना उमेदवारीचे संकेत मिळाल्याने राममंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमित्त साधून २१ ला इचलकरंजीत जंगी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भव्य मिरवणूक, साडी व कुर्ता, तसेच राममूर्ती वाटप केले जाणार आहे. यानिमित्ताने मतदारसंघातील प्रत्येक गावात आणि चौका-चौकात आवाडेंचे फलक लावण्यात येणार आहेत. या मतदारसंघात आवाडे गटाची चांगली ताकद आहे, यंत्रणा मोठी आहे. यामुळे ते शेट्टी यांना चांगली लढत देऊ शकतील, असे भाजपच्या नेत्यांना वाटत आहे.

भाजपतर्फे लोकसभा लढण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर इच्छुक आहेत. मात्र, त्यांची ताकद कमी पडण्याची शक्यता असल्याने आवाडे यांचे नाव पुढे करण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेट्टी यांची उमेदवारी निश्चित आहे. यामुळे आवाडे आणि शेट्टी अशी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.

याबदल्यात विधानसभा निवडणुकीत आवाडेंनी हाळवणकरांना इचलकरंजी मतदारसंघात मदत करावी, असा पर्याय पुढे आणल्याची चर्चा आहे. यावर अजून अंतिम निर्णय न झाल्यानेच राहुल यांच्या नावाची अधिकृत घोषणा लांबणीवर पडत असल्याचे समजते.

(Edited By - Rajanand More)

R...

Rahul Aawade Raju Shetty, Dhairyasheel Mane, Sanjay Mandlik
NCP News : अजितदादांच्या राष्ट्रवादीत उमेश पाटलांना बढती...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com