RAY Nagar : 'आडममास्तरांनी आमच्या आयुष्याचं सोनं केलं, आता आम्ही त्यांना...' : लाभार्थींनी व्यक्त केल्या भावना!

Adam Mastar : असंघटित कामगारांसाठी आडममास्तरांनी जवळपास 13 वर्षांचा संघर्ष करून त्यांना स्वस्तात घरे मिळवून दिली आहेत...
RAY NAGAR
RAY NAGARSarkarnama

Solapur Ray Nagar : सोलापुरातील असंघटित कामगारांसाठी साकारण्यात आलेल्या रे-नगर या प्रकल्पाचे हस्तांतर शुक्रवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. यासाठी शासन, प्रशासन आणि भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. असे असले तरी हा प्रकल्प माकपचे नेते कॉम्रेड आडममास्तर यांच्या दूरदृष्टीतून साकारला गेला आहे.

तर, 'मास्तरांनी आमच्या आयुष्याचे सोनं केले आहे, आधी आमच्या हाताला काम आणि आता राहायला बंगला दिला आहे. त्यामुळे कोणी कितीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू द्या, आमच्यासाठी मास्तरच सर्व काही आहेत,' अशी प्रतिक्रिया रे-नगरमध्ये घर मिळालेल्या लाभार्थी महिलांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली आहे.

रे-नगर (RAY Nagar) हा तब्बल 30000 घरांचा प्रकल्प. या प्रकल्पाचे प्रवर्तक कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या दूरदृष्टीतून आणि संघर्षातून साकारला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 15000 घरांचे शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हस्तांतर केले जाणार आहे.

गोरगरीब शिलाई कामगार, बिडी कामगार महिला, हातमजूर, बिगारी अशा अनेक वर्गांतील असंघटित कामगारांसाठी आडममास्तरांनी जवळपास 13 वर्षांचा संघर्ष करून स्वस्तात घरे मिळवून दिली आहेत. हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून कामगारांना स्वत:च्या हक्काची घरे मिळणार आहेत. याचे सर्व श्रेय आडममास्तरांनाच जात असल्याची प्रतिक्रिया या योजनेतील लाभार्थी महिलांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

RAY NAGAR
RAY Nagar: शरद पवार, फडणवीसांनी शब्द पाळला; आडम मास्तरांच्या 13 वर्षांच्या संघर्षाला यश

रे-नगरमध्ये मिळालेल्या घरासंदर्भात प्रतिक्रिया येथील बिडीकामगार अंबिका केचगुंडी म्हणाल्या की, आम्ही 20 वर्षांपासून 10X10 च्या घरात 5 व्यक्ती राहतो. आम्ही सध्या जिथे राहतोय त्या जागेला आम्ही महिन्याला 2.5 हजार रुपये भाडे देतोय. रोज ज्यावेळी 700 बिडी तयार कराव्या लागतात, त्यावेळी मला 150 रुपये रोजगार मिळतो, पती शिलाई कामगार म्हणून काम करतात. ते महिन्याला 5 हजार रुपये कमावतात, अशा परिस्थितीत आम्हाला भाडे देणे अवघड होते, तर स्वत:चे घर कुठून बांधणार? महागाई इतकी प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत येणाऱ्या मासिक उत्पन्नातून घर चालवणेच आमच्यासाठी मोठ्या कसरतीचे काम आहे. अशाही परिस्थितीतून केवळ आडममास्तरांनी (Adam Mastar) आमच्या आयुष्याचं सोनं केलं.

अंबिका म्हणाल्या की, एकावेळी 5 ते 6 लाख कुठून आणायचे आणि आणले तरी तेवढ्या किमतीत घर मिळणे कठीणच आहे. अशा परिस्थितीत आडममास्तरांनी आमच्यासाठी मोठा लढा उभारला आणि आज आम्हाला एका बंगल्यात राहायला जायची संधी मिळाली आणि आमच्यासाठी 1 BHK फ्लॅट फक्त घर नाही तर एक बंगलाच असल्याचीही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच या प्रकल्पासाठी आम्ही खूप अडचणीतून पैसे गोळा केले आहेत. प्रसंगी गळ्यातील सोने गहाण ठेवले आणि 50000 रुपये भरले, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

RAY NAGAR
Adam Mastar : रे-नगरमुळे माझं डिपॉझिट जप्त झालं होतं : आडममास्तरांनी सांगितली 'ती' आठवण!

आमच्या या सर्व अडचणी मास्तर जवळून पाहत होते. आमच्या अडचणींची त्यांना जाणीव होती, म्हणूनच त्यांनी हा प्रकल्प तडीस घेऊन जाण्याचा निश्चय केला आणि तो पूर्णत्वास नेला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच हा प्रकल्प शहरापासून लांब असून सध्या कामाला येण्या-जाण्यासाठी थोड्या अडचणी निर्माण होणार असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. त्यामुळे ज्याप्रमाणे घरे मिळाली त्याप्रमाणे त्याच भागात लघुउद्योग आले तर महिला कामगारांना ते अधिक सोयीचे ठरेल, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com