Kolhapur News : 'मशाल की हाथ' उद्या ठरणार; कोल्हापूरसाठी शाहू महाराज जवळपास निश्चित...

Eknath Shinde : कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर यापूर्वी शिवसेनेचे दोन खासदार विजयी झालेत, पण शिवसेना फुटल्यानंतर विद्यमान खासदारांनी शिंदे गटाचा पर्याय निवडला.
Satej Patil, Shahu Chhatrapati Maharaj, Udhav Thackeray
Satej Patil, Shahu Chhatrapati Maharaj, Udhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात लोकसभेचा उमेदवार कोण यावर पडदा पडल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत एकमत झाल्याने ही जागा काँग्रेसला दिल्याचे जवळपास निश्चित मानले जाते. काँग्रेसकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचे निश्चित आहे. त्याबदल्यात मुंबईतील काँग्रेसच्या वाट्याची जागा शिवसेनेला दिली जाणार असल्याची माहिती आहे. उद्या (मंगळवारी) मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे आल्यास या जागेवर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. खासदार शरद पवार व कॉँग्रेस नेत्यांचीही या नावाला संमती आहे. तथापि, जागा शिवसेनेला देऊन शाहू महाराजांना उमेदवारी द्यावी, असाही प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्याकडून आहे. मंगळवारी यावरही निर्णय होणे अपेक्षित आहे. यापूर्वी कोल्हापूरच्या दोन्ही जागांवर शिवसेनेचे दोन खासदार विजयी झालेत.

पण शिवसेना फुटल्यानंतर विद्यमान खासदारांनी शिंदे गटाचा पर्याय निवडला. मात्र, या दोन्ही जागेवर महाविकास आघाडीत ठाकरे गटाने या दोन्ही जागेवर दावा केला आहे, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेदेखील कोल्हापूरच्या जागेवर दावा केला आहे, पण सध्याच्या घडीला राष्ट्रवादी व काँग्रेसकडे प्रभावशील उमेदवार नाही.

Satej Patil, Shahu Chhatrapati Maharaj, Udhav Thackeray
Kolhapur News : जयंतराव पाटलांचा वेगळा डाव? प्रतीक पाटलांच्या चर्चेमुळे शेट्टी-मानेना धसका

पण, गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वा शिवसेनेचा दावा या जागेवर कायम राहील, असे वाटत होते; पण खासदार शरद पवार यांचा दौरा, त्यांच्याकडून शाहू महाराज यांची भेट व त्यानंतर निवडणूक लढवण्याचे शाहू महाराज यांनी दिलेले संकेत पाहता ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता आहे. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगितली जाते. शिवसेनेकड्न माजी आमदार संजय घाटगे, विजय देवणे व गोकुळचे संचालक डॉ. चेतन नरके यांची नावे आघाडीवर आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रावादीकडून जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, काँग्रेसकडून बाजीराव खाडे हे एकमेव इच्छुक आहेत. शाहू महाराज यांनी आपल्याला 'ऑफर' आल्याचे जाहीर केल्यानंतर या मतदारसंघाची राजकीय गणितेच बदलून गेली आहेत. त्यातून कोल्हापूरची जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता वाढली आहे. कालच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांच्या प्रमुखांची घेतलेली बैठक हा त्याचाच एक भाग आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Satej Patil, Shahu Chhatrapati Maharaj, Udhav Thackeray
kolhapur News : महाडिक गटाचा दणका; सतेज पाटील गटाला उचगावमध्ये खिंडार...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com