Satara Loksabha 2024 : भाजपला रोखण्यासाठी साताऱ्यात पवारांनी टाकला डाव; जयंत पाटील-पृथ्वीराज चव्हाणांमध्ये खलबत्तं

Political News : महाविकास आघाडीतील घटक पक्षात सातारा आणि सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत कऱ्हाडमध्ये खलबत्ते सुरू आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
prathvairaj cahvan, jaynat patil
prathvairaj cahvan, jaynat patil Sarkarnama
Published on
Updated on

सचिन शिंदे

Satara loksabha News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी व महायुतीमध्ये काही जागावरून जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

महाविकास आघाडीतील घटक पक्षात सातारा आणि सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत कऱ्हाडमध्ये खलबत्ते सुरू आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. (Loksabha election 2024 News)

prathvairaj cahvan, jaynat patil
Sunetra Pawar News : 'मोदी विकासपुरुष, तर अजितदादा विकासाचे पाईक!'

या दोन्ही नेत्यांत तब्बल एक तासभर बंद दाराआड चर्चा झाली. त्याचा तपशील सांगण्यास नकार देत आमदार पाटील यांनी त्याबाबत नंतर बोलतो, असे म्हणत तेथून निघून गेले. गेल्या आठवड्यातच काँग्रेसचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी भेट घेऊन आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती. त्यामुळे आजच्या भेटीने पुन्हा एकदा सातारा व सांगली जिल्ह्यातील उमेदवारीचा खल अद्यापही सुरू असल्याचे समोर आले आहे.

महाविकास आघाडीत सांगलीतील जागेवरून मतभेद आहेत. तर आघाडीचे साताऱ्यातील उमेदवार निश्चित होताना दिसत नाही. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष पाटील (Jayant Patil) यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. त्या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

जवळपास तासभर त्यांनी चर्चा केली. त्यातील तपशील समजू शकला नाही. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत त्यांनी आवर्जून आमदार चव्हाण यांची भेट घेतल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाकडून स्पष्ट केले. त्यासोबतच यावेळी दोन नेत्यांमध्ये सातारा लोकसभेची निवडणूक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prathviraj chavan) यांनी लढवावी याबाबत चर्चा झाली असल्याचे समजते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा, सांगली लोकसभेचा तिढा सुटण्याची शक्यता

यावेळी या दोन नेत्यांमध्ये साताऱ्याबरोबरच सांगली लोकसभेच्या जागेवरूनही चर्चा झाली. इंडिया आघाडीच्या बैठीकापूर्वीच दोन्ही दिग्गज नेत्याच्या झालेल्या चर्चा सध्या जोरदार चर्चेत आहे. त्यामुळे सातारा व सांगली लोकसभेचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Edited By : Sachin Waghmare)

prathvairaj cahvan, jaynat patil
Satara Lok Sabha News: सातारा लोकसभेचा उमेदवार कोण? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितले

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com