Loksabha Election 2024 : नुसत्याच चर्चा की खरंच? सातारा जिल्ह्यातील 3 बडे नेते कुंपणावर...

Satara Politics : लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सातारा जिल्ह्यातील राजकारण पेटले आहे. तिकीट न मिळाल्यास काही नेते इकडून तिकडे उड्या मारण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तिकीट वाटप झाल्यानंतर बऱ्याच घडामोडींना वेग येण्याची शक्यता वर्तविली जाते.
Udayanraje Bhosale, Eknath Shinde, Sharad Pawar, Ajit Pawar
Udayanraje Bhosale, Eknath Shinde, Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Satara Political News :

राज्यातील राजकारण खूप अस्थिर झालेले आहे. कुठला नेता कधी कोणत्या पक्षात प्रवेश करेल, हे सांगता येत नाही. साडेचार वर्षांत महाराष्ट्राने तीन मुख्यमंत्री आणि चार उपमुख्यमंत्री पाहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्तेसाठी महाराष्ट्रात कोण, कुठे, कधी जाईल, हे आज कुणीही खात्रीपूर्वक सांगू शकणार नाही. आता तर लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यामुळे राजकारण आणखी ढवळून निघालेले आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांतील तीन बडे राजकीय नेते पक्ष प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाच्या चर्चाबाबत तर्कवितर्क लढवले जात असल्याने कार्यकर्त्यांनाच नव्हे पदाधिकाऱ्यांनाही अंदाज लावणे कठीण झाले आहे. 

Udayanraje Bhosale, Eknath Shinde, Sharad Pawar, Ajit Pawar
Chitra Wagh News : 'साताऱ्यातील ताईंच्या भावना हायकमांडकडे पोहोचवणार'; उदयनराजेंसाठी 'वाघांची' डरकाळी!

सातारा जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघांचा सहभाग आहे. इथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) अंतर्गत अनेक कुरघोड्या सुरू आहेत. माढ्यात रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) हे आपल्या भावाला लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून, भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट मिळू नये, यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे.

दुसरीकडे पाटण विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित पाटणकर हेही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. माढ्यातून रामराजे नाईकनिंबाळकर यांचे बंधू संजीवराजे यांना तिकीट न मिळाल्यास ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून चार जण इच्छुक असून, यामध्ये विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) आणि त्यांचे पुत्र सारंग पाटील (Sarang Patil) यांना पक्षातूनच विरोध आहे. या पिता-पुत्रांव्यतिरिक्त जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर (Satyajit Patankar) आणि जिल्हाध्यक्ष सुनील माने (Sunil Mane) हेही इच्छुक आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि भाजपची (BJP) वाढलेली ताकद यांचा विचार करताना पूर्ण लोकसभा मतदारसंघात ताकदीचा उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. अशावेळी सत्यजित पाटणकर यांना डावलले गेल्यास त्यांना अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर देतील, अशी चर्चा आहे. सध्याच्या वातावरणात नेत्यांच्या बाबतीत केवळ चर्चा आहेत की, खरंच पक्ष प्रवेश करणार याबाबत कोणत्याच राजकीय जाणकारांना काहीही नक्की सांगता येत नाही. या परिस्थितीमुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. 

काँग्रेसमधील 'पाहुणा' गळाला लागणार?

सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाही (Shivsena) हक्क आहे. महायुतीला सध्या राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) सोडल्यास पर्यायी चेहरा मिळालेला नाही. सातारा आणि कराड अशा दोन विभागांचा विचार करून लोकसभेचा उमेदवार दिल्यास विजयाचा मार्ग सुकर असतो. त्यामुळे महाविकास आघाडीने (MVA) कराड भागातील उमेदवार दिल्यास महायुतीतून भाजप किंवा शिवसेनेलाही याच भागातील उमेदवार द्यावा लागणार आहे. यांचा विचार करून पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या मेहुण्याच्या पाहुण्याची चर्चा सुरू आहे. हे पाहुणे काँग्रेसमध्ये (Congress) असून, त्यांना महायुतीत घेण्याची बोलणी सुरू असल्याचे कळते.

काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि मंत्री शंभू देसाई हे साडू-साडू आहेत. त्यामुळे काँग्रेसमधील मेहुण्याचा पाहुणा महायुतीच्या गळाला लागणार का, याचीही राजकीय चर्चा सुरू आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Udayanraje Bhosale, Eknath Shinde, Sharad Pawar, Ajit Pawar
Sangli Congress News: ...तर जिल्ह्यातील काँग्रेस विसर्जित करू; विक्रमसिंह सावंतांचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com