Kishore Darade Vs Vivek Kolhe : आमदार किशोर दराडेंना विवेक कोल्हेंची भीती का वाटते?

Nashik Teachers Constituency Kishore Darade Vivek Kolhe : विवेक कोल्हे यांनी माघार घेतल्यास त्याचा लाभ कोणाला होईल? यापेक्षाही विवेक कोल्हे यांच्यामुळे कोणता उमेदवार अडचणीत येईल हे महत्त्वाचे आहे.
Vivek Kolhe MLA Kishore Darade
Vivek Kolhe MLA Kishore Daradesarkarnama

Kishor Darade News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात आता तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सगळ्याच नेत्यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच शिक्षकांचा 'भाव' वाढणार आहे.

महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे, महाविकास आघाडी तर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गुळवे आणि संजीवनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त विवेक कोल्हे हे प्रमुख उमेदवार आहेत. या निवडणुकीत अपक्ष विवेक कोल्हे यांचा विद्यमान आमदार दराडे यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसते.

गेल्या आठवड्याभरात या निवडणुकीच्या निमित्ताने घडलेल्या राजकीय घटनाक्रमाने शिक्षकांना अंतर्मुख करण्यास भाग पाडले आहे. शिंदे गटाकडून विवेक कोल्हे यांच्याशी संबंधित संस्थांवर गेल्या आठवड्याभरात तीन वेळा धाडी टाकण्यात आल्या. अप्रत्यक्षरीत्या कोल्हे यांनी माघार घ्यावी यासाठी हे घडले असे दिसते.

विवेक कोल्हे Vivek Kolhe यांनी माघार घेतल्यास त्याचा लाभ कोणाला होईल? यापेक्षाही विवेक कोल्हे यांच्यामुळे कोणता उमेदवार अडचणीत येईल हे महत्त्वाचे आहे. सध्या ज्या शिक्षण संस्थांमध्ये मोठ्या संख्येने मतदार आहेत त्यात नाशिकची मराठा विद्या प्रसारक समाज संस्था (मविप्र) प्रमुख आहे.

Vivek Kolhe MLA Kishore Darade
NCP Sharad Pawar : लोकसभेच्या निकालाने अनिल कदम जोमात, दिलीप बनकरांचे टेन्शन वाढलं!

माविप्र संस्थेत एक गट कोल्हे यांच्यासाठी कार्यरत आहे. त्याची धास्ती ठाकरे गटाचे गुळवे यांच्या पेक्षाही शिंदे गटाच्या दराडे यांनी अधिक घेतल्याचे जाणवते. पाचही जिल्ह्यात रीच असलेले कोल्हे हे उमेदवार आहेत. त्यात नाशिकच्या मतांमधील ही फूट दराडे यांना नुकसान करू शकते.

या निवडणुकीत शिंदे गट गरजेपेक्षा अधिक आक्रमक झालेला दिसतो. दराडे यांच्याशी नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराच्या माघारीसाठी काय काय दिव्य घडले हे सर्वश्रुत आहे. दराडे Kishore Darade या अपक्ष उमेदवाराची माघार झाली. मग कोल्हे आणि गुळवे यांच्याशी नाम साधर्म्य असलेले अनेक उमेदवार कोणी उभे केले आहेत? याची चर्चा आता शिक्षकांमध्ये होत आहे.

शिक्षक हा समाजाला विद्यार्थ्यांना शिक्षित करतो. केवळ नाम साधर्म्य असलेले उमेदवार दिल्याने शिक्षक मतदारांचा गोंधळ होईल, असे मानणे भाबडेपणाचेच ठरेल. मात्र काही उमेदवारांनी तसे गृहीत धरले असावे. या निमित्ताने सत्तेचा गैरवापर, दबावतंत्र, उमेदवाराची पळवा पळवी आदी प्रकार शिक्षक या समाजातील आदर्श असलेल्या मतदारांच्या निवडणुकीत होत आहे.

अपक्ष कोल्हे यांच्या माघारीसाठी देखील असेच प्रकार झाले, असे कोल्हे यांनी म्हटले आहे. त्यांनी याबाबत थेट सत्ताधारी पक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे अंगुली निर्देश केला आहे. मुख्यमंत्र्यांचा उमेदवार कोण? हे स्पष्ट आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या उमेदवारांनी कोल्हे यांचा एवढा धसका का घेतला याचीच सध्या चर्चा आहे.

Vivek Kolhe MLA Kishore Darade
Nashik Politics: देवळालीत 'गद्दांराना' फटका; विधानसभेसाठी अहिरेंसमोर 'एक अनार तीन बिमार'चे आव्हान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com