Loksabha Election 2024 : 'मविआ'च्या विशाल पाटलांच्या पायाला भिंगरी, भाजपचे संजयकाका, देशमुखांचा भेटीगाठीवर भर

Sangli Political News : काँग्रेसमधील डॉ. पतंगराव कदम, वसंतदादा आणि मदनभाऊ गट एकत्र आला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकवाक्यता आहे.
Vishal Patil, Prithviraj Deshmukh, Sanjaykaka Patil
Vishal Patil, Prithviraj Deshmukh, Sanjaykaka PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News :

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली तर एप्रिलमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर उमेदवार निश्चित करण्यावर भर दिला जात आहे. अशातच सांगली लोकसभेसाठी उमेदवारीवरून रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आहे.

सांगलीत महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विशाल पाटील यांचे तिकीट फायनल झाले आहे. त्यामुळे प्रचारासाठी ते पायाला भिंगरी बांधून फिरत आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. तर भाजपचे खासदार संजय पाटील हे देखील इच्छूक आहेत. त्यामुळे भाजपचा उमेदवार कोण असेल, याची जिल्ह्यात उत्कंठा आहे. Loksabha Election 2024

Vishal Patil, Prithviraj Deshmukh, Sanjaykaka Patil
Sangli Congress MLA : सांगलीच्या आमदारांची पंतप्रधानांनाही धास्ती..! काँग्रेस नेत्याचा दावा...

भाजपचे खासदार संजय पाटील (Sanjaykaka Patil) यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. तरीही त्यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. आणि पृथ्वीराज देशमुख (Prithviraj Deshmukh) यांनीही दिल्लीला जाण्याची तयारी केल्यामुळे पाटील आणि देशमुख यांचे जिल्हाभर दौरे सुरू झाले आहेत.

लोकसभा निवडणुकीत 'इंडिया' आघाडी (INDIA Alliance) आणि भाजपप्रणीत 'महायुती' (Mahayuti) असा सामना होणार आहे. या निवडणुकीची जय्यत तयारी दोन्ही बाजूंनी सुरू आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीत सांगलीची जागा जिंकण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.

काँग्रेसने 'भारत जोडो यात्रे'च्या धर्तीवर जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढली. पदयात्रेद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी लोकसभेसाठी काँग्रेसकडून विशाल पाटील यांनी उमेदवारी फायनल असल्याचे सांगितले आहे. पक्षाने त्यांना कामाला लागावे, अशा सूचना दिल्या आहेत. त्यादृष्टीने विशाल पाटील हे पायाला भिंगरी बांधून जिल्हाभर फिरत असल्याचे दिसून येते.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा! )

भाजपचे (BJP) खासदार संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांना आव्हान दिले होते. त्यांनी मैदानात उतरून लढावे, असे आव्हान दिले होते. आता निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विशाल पाटील आक्रमक होऊन भाजपच्या संजयकाकांना प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यालय सुरू करून कामाला लागले आहेत. लोकसभेची निवडणूक जिंकणारच असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे.

काँग्रेसमधील डॉ. पतंगराव कदम, वसंतदादा आणि मदनभाऊ गट एकत्र आला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकवाक्यता आहे. त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न काँग्रेसने सुरू केला आहे. विशाल पाटील यांनी जिल्हाभर दौरे करून जुन्या-नव्या कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत.

Vishal Patil, Prithviraj Deshmukh, Sanjaykaka Patil
Ajit Pawar Vs Jayant Patil : अजितदादांची इस्लामपुरात एन्ट्री, पण जयंत पाटलांबाबत चुप्पी!

भाजपकडूनही निवडणुकीची तयारी केली जात असताना खासदार संजयकाका पाटील यांच्या कामाबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. त्याकडे लक्ष न देता खासदारांनी कामाचा सपाटा लावला आहे. सलगरे ड्रायपोर्टला मंजुरी मिळवणे, कवलापूर विमानतळ मंजुरी आणि जिल्ह्यातील प्रलंबित रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल तात्काळ बंद करण्याच्या रेल्वेच्या भूमिकेविरोधात खासदार आक्रमक झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) कालावधीत लोकांची नाराजी नको म्हणून जुना पूल सुरू ठेवण्याचा त्यांचा आग्रह आहे.

खा. पाटील यांना पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. विमानतळ आणि ड्रायपोर्ट हे जिल्ह्याच्या विकासाचे केंद्र आहे, त्यादृष्टीने कामे होणे गरजेचे होते, परंतु दोन्ही कामे झाली नसल्याबाबतची खंत व्यक्त करत अपयशाचे खापर त्यांनी खासदारावर फोडले.

तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज, आटपाडी, खानापूर व जत या तालुक्यांत पृथ्वीराज देशमुख संजयकाकांच्या विरोधकांची भेटी घेत आहेत. आर. आर. आबा गटाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आहे.

एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष देशमुख हे वेगवेगळ्या बैठका घेऊन एकमेकांना आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसते. त्यात भाजपमधील अंतर्गत कलह दिसून येत आहे.

(Edited by Avinash Chandane)

Vishal Patil, Prithviraj Deshmukh, Sanjaykaka Patil
Kolhapur Loksabha : महाविकास आघाडीच्या उमेदवारीची गाडी छत्रपती घराण्याच्या स्टेशनवरच थांबणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com