Wai BJP News : नवीन राजकीय समीकरणांमुळे निष्ठावंतांची अडचण : नरेंद्र पाटील

Narendra Patil केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली.त्याबद्दल भाजपातर्फे 'मोदी @ 9'अंतर्गत आयोजित व्यापारी संमेलनात नरेंद्र पाटील बोलत होते.
Narendra Patil, Narendra Modi
Narendra Patil, Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

-भद्रेश भाटे

Wai BJP News : राज्यातील नवीन राजकीय समीकरणामुळे निष्ठावंत कार्यकर्ते अडचणीत येऊ शकतात. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत समाज आणि पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना निश्चित संधी मिळेल. देशातील सर्व विरोधी पक्ष आणि नेते एकत्र आले तरी आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्या सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली.त्याबद्दल भाजपातर्फे 'मोदी @ 9'अंतर्गत आयोजित व्यापारी संमेलनात नरेंद्र पाटील Narendra Patil बोलत होते. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य मदन भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर,अनिल देव, सचिन फरांदे, बबलू चौधरी (खंडाळा), सतीश भोसले, रोहिदास पिसाळ, राकेश फुले,अलंकार सुतार, उपस्थित होते.

श्री.पाटील यांनी महामंडळाची स्थापना आणि विविध कर्ज योजना याविषयी माहिती दिली.ते म्हणाले, महामंडळाने स्थापनेपासून आतापर्यंत ६५ हजार लाभार्थीना ४ हजार ५०० कोटी रुपये कर्ज दिले असून ४५० कोटी व्याज परतावा दिला आहे. या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यवसायाचा प्रकल्प अहवाल व आर्थिक पात्रता प्रमाणपत्र (एल.ओ.आय ) बंधनकारक असतो.

सर्व सामान्यांना छोटे उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी एक पानाचा प्रकल्प अहवाल घेऊन १० हजार ते २ लाख रुपये पर्यंत विना तारण व विना व्याज सहज व सुलभ कर्ज उपलब्ध होईल अशी नवीन योजना अमलात आणली आहे. त्याचा लाभ सामान्य शेतकरी, कष्टकरी व व्यापारी यांनी घेऊन स्वतःची आर्थिक उन्नती साधावी. कर्ज घेतल्यानंतर प्रत्येकाने व्यवसायाची बंधने पाळून प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करावी एवढीच अपेक्षा आहे.

Narendra Patil, Narendra Modi
Satara BJP News : जागा वाटपाच्या तिढ्यावर आमदार गोरेंनी स्पष्टच सांगितले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com