Sharad Pawar, Shekhar Gore with other leaders
Sharad Pawar, Shekhar Gore with other leadersSarkarnama

Madha Lok Sabha News : उद्धव ठाकरेंचे जिल्हा संपर्क प्रमुख गोविंद बागेत, गोरे कोणाला मदत करणार?

Shekhar Gore News : राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळत नसल्याचे कारण देत शेखर गोरे आक्रमक झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा ते प्रचार करणार की नाही, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे.

विशाल गुंजवटे

Madha Constituency News : माढा लोकसभा मतदारसंघात (Madha Lok Sabha News) कोणाला मदत करायची, यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांच्याशी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत गोविंद बागेत चर्चा केली. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.

शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आमचा पक्ष महाविकास आघाडीचा घटकपक्ष असूनही माण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (NCP) कधीच आघाडी धर्म पाळत नाही. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत आम्ही आघाडी धर्म पाळणार नाही, असे सूतोवाच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे (Shekhar Gore) यांनी केले होते.

Sharad Pawar, Shekhar Gore with other leaders
Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर, शरद पवारांच्या मल्लाशी भिडणार

शरद पवार (Sharad Pawar) यांनी गोरेंना आज बारामती (Baramati) येथे गोविंद बागेत बोलावून घेतले होते. या वेळी झालेल्या बैठकीत शेखर गोरे यांच्याशी पवार यांची सकारात्मक चर्चा झाली. या वेळी शेखर गोरे म्हणाले, येत्या दोन दिवसांत आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार व मी अशी आमची एकत्र बैठक होणार आहे. त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघात कोणाला मदत करायची हा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शेखर गोरे म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर आपण माण मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद कशी वाढवली. सत्ता मिळवूनही त्यानंतर राष्ट्रवादीने आपल्यावर कसा अन्याय केला. याबाबतची माहिती सांगितली. तसेच तुमचे आशीर्वाद घेऊन मी बाहेर पडतोय हे सांगण्यासाठी फलटणच्या सभेत आलो होतो. त्यावेळी गोंधळ उडाला याची माहिती सांगितली.

शेखर तुम्ही राष्ट्रवादीत असताना पक्षाला उभारी देत सत्ताकेंद्रे मिळवली, याची नोंद आमच्याकडे आहे. यादरम्यान, तुम्ही गुन्हेही अंगावरती घेतलेत. पक्षासाठी एवढे करूनही तुम्हाला न्याय मिळाला नसल्याने तुम्ही नाराज होणं साहजिकच आहे. पण, झाले गेले सर्व समज - गैरसमज विसरून जावूयात. पाठीमागचे काही काढू नका. आता एकत्र येऊन काम करूया, असे आवाहन पवारांनी केल्याची माहिती गोरे यांनी दिली.

आपल्याला कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचा आहे. तुम्ही कामाला लागा. तुमच्या माण मतदारसंघात महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एकत्र येऊन एक मेळावा लावूया. या वेळी माझ्यासह उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा घेण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केल्याचे गोरे यांनी सांगितले.

(Edited By - Rajanand More)

R

Sharad Pawar, Shekhar Gore with other leaders
Lok Sabha Election 2024 : लोकसभा ठरवणार, सोलापूर पवारांचे की फडणवीसांचे!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com