Lok Sabha Election 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंना उमेदवारी जाहीर, शरद पवारांच्या मल्लाशी भिडणार

Satara Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत तिढा होता. अखेर हा तिढा सुटला असून, उदयनराजेंना उमेदवारी जाहीर झाली आहे.
Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Udayanraje Bhosale, Shashikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

गेल्या काही दिवसांपासून सातारा लोकसभेच्या ( Satara Lok Sabha Election 2024 ) जागेवरून वाद सुरू होता. सातारा लोकसभा मतदारसंघातून राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) लढण्यास इच्छुक होते. पण, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असल्यानं तिढा कायम होता. साताऱ्याच्या बदल्यात अजित पवार गटाकडून नाशिकच्या जागेची मागणी करण्यात येत होती. अशातच भाजपकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde ) विरुद्ध उदयनराजे भोसले यांच्यात थेट लढत होणार आहे.

भाजपकडून राज्यसभेवर गेलेल्या उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale ) यांना साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah )यांची भेट घेतली. या भेटीसाठी उदयनराजेंना दोन दिवस प्रतीक्षा करावी लागली. शाहांना भेटून साताऱ्यात परतल्यानंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. पण, महायुतीतील अंतर्गत वादांमुळे उदयनराजेंची उमेदवारी लटकली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

2019 च्या लोकसभा निवडणुकीत साताऱ्याची जागा राष्ट्रवादीनं जिंकली होती. उदयनराजे राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झाले. मात्र, काही महिन्यांत राजीनामा देऊन त्यांनी भाजपत प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक झाली. भाजपनं उदयनराजेंना तिकीट दिलं. परंतु, राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा पराभव केला. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं येथे दावा सांगितला.

अजित पवार पवार सातारा सोडण्यास तयार नव्हते. उदयनराजेंना घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर दिली होती. पण, ही ऑफर उदयनराजेंनी धुडकावल्याचं सांगण्यात येते. साताऱ्याच्या बदल्यात नाशिकच्या जागेची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली. तेथे सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. छगन भुजबळांसाठी राष्ट्रवादीला नाशिकची जागा पाहिजे होती. मात्र, शिंदे सेना ही जागा सोडण्यास तयार नव्हती. नाशिकमुळे साताऱ्याची जागा अडकली होती.

अखेर भाजपकडून उदयनराजे भोसले यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार, माथाडी नेते शशिकांत शिंदे ( Shashikant Shinde ) यांच्याशी लढत होणार आहे. या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Satara Lok Sabha Election 2024 : कमळाला घड्याळाचे काटे टोचू लागले; 'या' नेत्याच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी लोकसभा अर्ज घेतला होता. त्यानंतर सोमवारी ( 15 एप्रिल ) अनामत रक्कम जमा केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल आहे. त्यामुळे 18 एप्रिलला उदयनराजे अर्ज दाखल करू शकतात.

R

Udayanraje Bhosale, Shashikant Shinde
Satara NCP News : संघर्षाच्या काळात शरद पवार गटात 'नाराजीनाट्य'; सुनील माने वेगळी भूमिका घेणार...?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com