Karmala News: महायुतीच्या प्रचारापासून दूर असलेल्या नारायण पाटलांची चंद्रकांतदादांनी घेतली भेट...

Former MLA Narayan Patil Meet Chandrakant Patil: धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार नारायण पाटील यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. नारायण पाटील यांनी 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते.
Former MLA Narayan Patil Meet Chandrakant Patil
Former MLA Narayan Patil Meet Chandrakant PatilSarkarnama
Published on
Updated on

Madha Lok Sabha Election 2024: करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील (Former MLA Narayan Patil) यांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भेट घेतली आहे. भाजपचे माढ्याचे उमेदवार खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज (10 एप्रिल) रोजी ते करमाळा दौऱ्यावर आले होते. करमाळा येथील दौरा आटोपल्यानंतर त्यांनी माजी आमदार नारायण पाटील यांची भेट घेतली.

आजच्या करमाळा (Karmala) दौऱ्यामध्ये आमदार संजय शिंदे माजी आमदार जयवंतराव जगताप व भाजपच्या (BJP) प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्ष रश्मी बागल यांच्या भेटी ठरलेल्या होत्या. या नियोजनात माजी आमदार नारायण पाटील यांची भेट नव्हती, मात्र चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी जेऊर येथे त्यांची भेट घेतल्यामुळे या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

भेटीदरम्यान, माजी आमदार नारायण पाटील यांना चंद्रकांत पाटील यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बंद खोलीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी आमदार नारायण पाटील यांच्यामध्ये चर्चा झाली. पण या नेत्यांमध्ये नेकमी काय चर्चा झाली याची माहिती समजू शकलेली नाही. (MLA Jayakumar Gore, former MLA Prashant Pracharak)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नारायण पाटील हे सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर आहे. मात्र माढा लोकसभेची निवडणूक (Madha Lok Sabha Election) जाहीर झाल्यापासून पाटील समर्थकांमध्ये लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत संभ्रम आहे. या निवडणुकीत नारायण आबांनी भविष्यात ठामपणे पाठीमागे उभा राहणाऱ्या नेत्याबरोबर राहावे अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Former MLA Narayan Patil Meet Chandrakant Patil
Kolhapur Loksabha Election : मनोबल वाढवण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून कार्यकर्त्यांना गाजर : सतेज पाटलांचा टोला

महाविकास आघाडीकडून त्यांना माढा लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील हे माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून ते महाविकास आघाडीकडून लोकसभेची निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरु आहेत. मोहिते पाटील आणि माजी आमदार नारायण पाटील यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे आहेत. नारायण पाटील यांनी 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. आजही तालुक्यांमध्ये पाटील यांचे वजन अधोरेखित करण्यासारखे आहे.

Former MLA Narayan Patil Meet Chandrakant Patil
Baramati Loksabha constituancy : शरद पवारांचा बारामतीत धमाका; फडणवीसांना ‘इट का जवाब पत्थर से’

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नारायण पाटील यांनी नाईक-निंबाळकर यांचा प्रचार केला होता. यावेळी मात्र ते कोणाला समर्थन देणार हे अद्याप जाहीर केलेलं नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नारायण पाटील यांची नियोजनात नसताना ही भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com