Kolhapur Loksabha Election : मनोबल वाढवण्यासाठी चंद्रकांत पाटलांकडून कार्यकर्त्यांना गाजर : सतेज पाटलांचा टोला

Satej Patil सतेज पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या जनतेने आता ठरवले आहे. खासदार बदला परिस्थिती बदलेल, खासदार बदला कोल्हापूर बदलेल. हा हट्टच कोल्हापूरच्या जनतेचा आहे.
Satej Patil, Chandrakant Patil
Satej Patil, Chandrakant Patilsarkarnama
Published on
Updated on

Kolhapur loksabha News : चंद्रकांत पाटील यांचा अभ्यास जास्त आहे. पुण्याच्या पोटनिवडणुकीत त्यांनी 'हु इज धंगेकर' असे म्हणाले होते. त्याचा परिणाम दिसला आहे. लोकसभेत 214 च्या जागेच्या पुढे भाजप जात नाही. ही आकडेवारी त्यांच्यासमोर आहे. कार्यकर्त्यांना मनोबल वाढवण्यासाठी त्यांची अशी वक्तव्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून येत आहेत. कार्यकर्त्यांना मोठं गाजर दाखवलं तरच ती पळतील. म्हणून चंद्रकांत पाटील यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी टोला लगावला आहे.

राज ठाकरे यांच्या पाठिंब्यावर बोलताना सतेज पाटील यांनी, राज ठाकरे यांच्या भूमिकेचे आश्चर्य वाटते. महाराष्ट्रामधील त्यांची भूमिका पाहून लोकांनाही आश्चर्य वाटले. 2019 मधील त्यांची भूमिका आणि आताची भूमिका वेगळी आहे. आम्हाला वाटल होतं महायुतीत जाऊन दोन ते तीन जागा लोकसभेच्या लढवतील. मात्र लढवायचीच नाही हा निर्णय मनसेसैनिकांना न पटणारा आहे. इतक परिवर्तन का झालं? हे कळायला मार्ग नाही. फोडाफोडीच्या राजकारणावेळी त्यांची भूमिका स्पष्ट होती. मात्र त्यांच्या निर्णयाने संभ्ररावस्था आहे. अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.

सांगलीतील प्रश्नावर मार्ग निघेल...

सांगलीच्या प्रश्नावरून बोलताना, स्थानिक परिस्थिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात हाताळत आहेत. स्थानिक काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून ते योग्य मार्ग काढतील. काँग्रेसचा सन्मान पुढील काळात कसा राहणार?यावर योग्य मार्ग निघेल. विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरून चर्चा सुरू आहे, राज्यातील नेतेही त्यांच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडी टिकावी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावे यासाठी तिन्ही पक्षांची एकमत आहे.

Satej Patil, Chandrakant Patil
Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापुरात मुश्रीफांना मोठा झटका; निष्ठावंताचा मंडलिकांच्या प्रचारास नकार, काँग्रेससोबत राहणार

काही जागांबाबत अडीअडचणी आहेत त्या येत्या पाच दिवसात मार्ग निघतील. सांगलीचा अंतिम निर्णय काल झालेला आहे. राज्यातील 48 जागांवरील जागावाटप झालेला आहे. त्यातून काही तक्रारी आणि काही जागांवर नाराजी येणे स्वाभाविक आहे. ती नाराजी दूर करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्व नेते एक दिलाने काम करताना दिसतील. भाजपला थांबवणे हे कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ लेव्हलच्या नेत्यांपर्यंत एकमत आहे. असेही सतेज पाटील म्हणाले.

सतेज पाटलांचा अशोक चव्हाणांना टोला

राज्यातील काँग्रेस नेत्यांवर टीका करताना अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला डिवचले. यावरून सतेज पाटील यांनी टोला लगावाला. काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या नेत्यांनी केलेल्या टिकेला किती महत्त्व द्यायचं? जागा वाटपाच्या शेवटच्या बैठकीत ही अशोक चव्हाण उपस्थित होते. काँग्रेसला टारगेट करून काँग्रेसच्या पाठीमागे असणाऱ्या लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न अशोक चव्हाण यांचा आहे. असा टोला आमदार पाटील यांनी लगावला. देश पातळीवर फोडाफोडीचा पेटंट केवळ भाजपकडे आहे. भाजपने फोडाफोडीचा पेटंटच घेतला आहे.

Satej Patil, Chandrakant Patil
Satej Patil Kolhapur News : शेट्टींना काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध; कार्यकर्त्यांनी सतेज पाटलांसमोर मांडली भूमिका

त्यामुळे दुसऱ्याकडे बोट करून चालणार नाही. तो पेटंट कोणालाच लागू होऊ शकत नाही. माझ्यावर अधिक प्रेम असल्याने माझ्यावर टीका सुरु आहे. कोल्हापूरची अस्मिता शाहू महाराजांच्या रूपाने दिल्लीत पोहोचणार आहे. लोकांच्या मनात शाहू महाराज आणि काँग्रेस फिक्स झाले आहे. अशा शब्दात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला सतेज पाटील यांनी उत्तर दिले आहे.

Satej Patil, Chandrakant Patil
ShivsenaUBT VS Congress : मुंबईतील जागेवरून ठाकरे गट-काँग्रेसमध्ये वाद होणार? उमेदवार लागला कामाला...

काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज Shahu Maharaj यांच्यावर खासदार म्हटले की, यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. त्यावर बोलताना सतेज पाटील यांनी, कोल्हापूरच्या जनतेने आता ठरवलेला आहे. खासदार बदला परिस्थिती बदलेल, खासदार बदला कोल्हापूर बदलेल. हा हट्टच कोल्हापूरच्या जनतेचा आहे. प्रचाराच्या पातळीला त्यांच्यापासून सुरुवात झाली आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून आलेल्या मेसेज वर आम्ही तक्रार केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satej Patil, Chandrakant Patil
Kolhapur Hasan Mushrif News : 'मंडलिकांची अडचण होईल असे कुणीच काही करू नका'; हसन मुश्रीफांनी कार्यकर्त्यांना सुनावले

सुरुवात केली आहे तर त्याला उत्तर दिलं जाईल. असच चालू झालं तर ते राजकारणात थांबणार नाही. असा इशारा सतेज पाटील यांनी दिला.पाच वर्षात ते कोल्हापूरचा विकास करू शकले नाहीत, त्यांची अकार्यक्षमता लपवण्यासाठीच त्यांची टीका सुरु आहे. याच अजिंक्यताराचा 2019 च्या साली रोल काय होता, हे जनतेला माहिती आहे. महाविकास आघाडीचे ताकद शाहू महाराज यांच्या पाठीशी आहे. जनतेच्या मनात शाहू महाराज आहेत त्यांना ते काढू शकत नाहीत. अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली.

Edited By : Umesh Bambare

Satej Patil, Chandrakant Patil
MLA Satej Patil : 'उद्या माझ्यासोबत स्टेजवर कोण येईल...' ; सतेज पाटलांचं सूचक विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com