Loksabha Election : लष्करी सैनिकांचे ‘ईटीपीएस’ प्रणालीद्वारे मतदान, नगर जिल्ह्यातील 9 हजार 986 सैनिक कार्यरत

Lok Sabha Election 2024 Voting : लष्करी सैनिकांचे शंभर टक्के मतदान करण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे. सैनिक ज्या भागातील रहिवासी आहेत. त्या भागात लोकसभा मतदारसंघाची मतपत्रिका पाठविण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे.
army soldiers Lok Sabha Election 2024 Voting
army soldiers Lok Sabha Election 2024 Votingsarkarnama
Published on
Updated on

Election News : नगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले दहा हजार सैनिक देशाच्या विविध भागात देशाची सेवा करत आहेत. लोकसभा निवडणुकीत Loksabha Election त्यांना मतदान करता येण्यासाठी इटीपीएस प्रणालीचा वापर केला जाणार आहे. या सैनिकांचे शंभर टक्के मतदान करण्याचे नियोजन निवडणूक आयोगाने केले आहे. सैनिक ज्या भागातील रहिवासी आहेत. त्या भागात लोकसभा मतदारसंघाची मतपत्रिका पाठविण्याची खास व्यवस्था करण्यात आली आहे.

army soldiers Lok Sabha Election 2024 Voting
Narendra Modi News : मोदींच्या सभेसाठी दिल्लीची यंत्रणा सतर्क; 12 किलोमीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त !

इलेक्ट्रॉनिक्स पोस्ट बॅलेट सिस्टिम (इटीपीएस) द्वारे मतपत्रिका पाठविली जाणार आहे. सैनिक ज्या भागात कार्यरत आहेत. त्या ठिकाणी मुख्यालयात ही मतपत्रिका इंटरनेटच्या माध्यमातून पाठविली जाणार आहे. लष्करातील अधिकारी ही मतपत्रिका डाउनलोड करून संबंधित सैनिकाला देणार आहेत. या ठिकाणी ही गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची खास सुविधा राहील. ही मतपत्रिका पोस्टाद्वारे संबंधित निवडणूक Election निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविली जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोस्ट विभागातून दररोज सायंकाळी मतपत्रिका लोकसभा Loksabha Election मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करतील. नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होत आहे. त्यानंतर सैनिकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून पोस्टाद्वारे मतपत्रिका संबंधित मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविले जाणार आहे. मतदान ते मतमोजणी यादरम्यान पुरेसा कालावधी आहे. पोस्टाद्वारे एक आठवड्यात मतपत्रिका मतमोजणीसाठी प्राप्त होतील, असा अंदाज आहे.

नगर जिल्ह्यात दहा हजार सैनिक

वायुसेना, नौसेना, स्थलसैना विभागात नगर जिल्ह्यातील 9 हजार 986 सैनिक कार्यरत आहेत. नगर दक्षिणेतील 7 हजार 199 सैनिक आहेत. पारनेर तालुक्यात सर्वाधिक 2 हजार 20 सैनिक आहेत. शिर्डी मतदारसंघात 2 हजार 787 सैनिक आहेत.

पोस्टमनला विशेष ओळखपत्र दिले जाणार

नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 4 जूनला होणार आहे. मतमोजणीच्या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत पोस्टाद्वारे प्राप्त होणाऱ्या मतपत्रिका घेतल्या जाणार आहेत. पोस्टमनला 4 जूनला सकाळी 8 वाजता मतदान मोजणी केंद्रावर येण्यासाठी विशेष ओळखपत्र दिले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.

(Edited By Roshan More)

R

army soldiers Lok Sabha Election 2024 Voting
Nandurbar Lok Sabha News : काँग्रेस उमेदवाराच्या अर्जावर भाजपचा आक्षेप; अर्जात माहिती लपवल्याचा आरोप...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com