BJP policy : ओमकार कदम प्रकरणावर भाजपचा दुटप्पीपणा चर्चेत! मंत्री माधुरी मिसाळ म्हणतात, कोण ओमकार कदम, काय केलं त्याने?

Madhuri Misal on Omkar Kadam : भाजपच्या कामगार आघाडीचा पदाधिकारी असलेल्या ओमकार कदम याने महापालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्याचे आता उघड झाले आहे.
Pune BJP Omkar Kadam Politics
Pune BJP Omkar Kadam Politicssarkarnama
Published on
Updated on

Pune News : काही दिवसांपूर्वी भाजपच्या कामगार आघाडीचा पदाधिकारी असलेल्या ओमकार कदम याने महापालिकेतील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन केल्या असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता प्रमोद कोंढरे या भाजपाच्या पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात कोंढरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा राजीनामा घेण्यात आला आहे. मात्र त्यानंतर ओमकार कदमवर पक्षाकडून कोणतीही कारवाई का? करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

काय होत प्रकरण?

भाजपच्या पदाधिकाऱ्याने पुणे महापालिकेच्या एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याचा गेल्या पाच महिन्यांपासून मानसिक त्रास देऊन छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असून, महापालिकेने भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ओंकार कदम आणि अक्षय कांबळे यांना महापालिकेत पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी केल्याबाबचे परिपत्रक पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काढले होते. त्यानंतर या प्रकरणांमध्ये ओमकार कदम याच्यावर शिवाजीनगर पोलीस चौकीमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाची महाराष्ट्रभर चर्चा झाली मात्र त्यानंतर देखील अद्याप पक्षाकडून ओमकार कदम याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

दरम्यान आज पुण्यातील विविध नागरी प्रश्नांबाबत माधुरी मिसाळ यांनी महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विचारल असती माधुरी मिसाळ म्हणाल्या. या प्रकरणांमध्ये व्यवस्थित कारवाई झाली आहे. पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला असून तो शहराध्यक्षांनी स्वीकारला देखील आहे. त्यामुळे जी प्रोसिजर होणे आवश्यक होतं ती झाली असल्याचं माधुरी मिसाळ म्हणल्या.

Pune BJP Omkar Kadam Politics
BJP Politics : सांगलीत भाजपची ताकद आणखी वाढली? दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन हाती घेणार'कमळ'

प्रमोद कोंढरे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर पक्षाकडून त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. मात्र ओंकार कदम प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील अद्याप पक्षाकडून ओंकार कदम वर कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आला आहे. याबाबत विचारला असता माधुरी मिसाळ यांनी प्रतिप्रश्न करत ओमकार कदम याचा नेमकं प्रकरण काय आहे. मला याबाबत खरंच काही माहिती नाही. असं सांगितलं. या प्रकरणाबाबत पत्रकारांनी त्यांना माहिती दिल्यानंतर माधुरी मिसाळ यांनी ओमकार कदम कडे भाजपचं कोणतंही पद नव्हतं त्यामुळे त्याचा राजीनामा घेतला नसाव, आमची आधीची बॉडी बरखास्त झाली आहे असं सांगितले.

Pune BJP Omkar Kadam Politics
BJP Politics : 'गांधी घराण्याच्या जवळचं घराणं फोडण्यात भाजप यशस्वी झाल्यास? मग काय धुळ्यातून कॉंग्रेस गायबच होणार..

त्यावर ओमकार कदम यांच्याकडे पुणे शहर कामगार आघाडीचे अध्यक्ष पद असल्याची माहिती आहे असं पत्रकारांनी माधुरी मिसाळ यांना सांगितलं. त्यावर याबाबत मी पुणे शहराध्यक्षांकडून अधिकची माहिती घेईल, असं माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केल. महाराष्ट्रभर या प्रकरणाची चर्चा झाली त्या प्रकरणाबाबत पुण्यामधून आमदार असलेल्या आणि राज्यात मंत्री असलेल्या माधुरी मिसाळ यांना काहीच माहिती नसल्याचं समोर आल्यानंतर हा चर्चेचा विषय बनला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com