Mahadev Jankar News : महादेव जानकर भडकले; म्हणाले, 'काँग्रेस-भाजप दोन्ही पक्ष गद्दार!'

Rashtriy Samaj Paksha : जनसुराज्य यात्रेतून जानकर रासपची ध्येयधोरणे जनतेसमोर मांडणार
Mhadev Jankar
Mhadev JankarSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यामध्ये जनस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा शनिवारी कोल्हार येथून प्रारंभ करण्यात आला आहे. रासपचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा उत्तर नगर जिल्ह्यामध्ये कोल्हार, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर आणि नेवासा या ठिकाणी जाणार आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जानकर गावागावांत जाऊन पक्षाची ध्येयधोरणे मांडणार आहेत. या वेळी जानकरांनी भाजपसह काँग्रेसवरही हल्लाबोल केला आहे. (Latest Political News)

जनस्वराज्य यात्रेने रविवारी शिर्डी, कोपरगाव या ठिकाणी सकाळच्या सत्रात दौरा केला, तर सायंकाळी श्रीरामपूर आणि नेवासा या ठिकाणी यात्रा पोहोचणार आहे. नेवासेमध्ये महादेव जानकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तत्पूर्वी, शिर्डी-कोपरगावमध्ये येताच ठीकठिकाणी यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील रासपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Maharashtra Political News)

Mhadev Jankar
Malegaon Sakhar Karkhana : प्रचंड ताकद पणाला लावूनही योगेश जगतापांचा पत्ता कट; 'माळेगाव' अध्यक्ष निवडीत नेमकं काय घडलं?

कोपरगाव तालुक्यातील कांदळकर वस्ती या ठिकाणी महादेव जानकर यांचा कांदळकर कुटुंबीयांच्या वतीने सन्मान करण्यात आला. या वेळी त्यांच्या गळ्यामध्ये नोटांचा हार घालून त्यांचं औक्षण करण्यात आले. इतर पक्षांवर टीका करण्यापेक्षा आपण आपल्या पक्षाची ध्येयधोरणे जनतेसमोर मांडत आहोत, असे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी या वेळी स्पष्ट केले.

कोल्हारमध्ये जनस्वराज्य यात्रेचा प्रारंभ करताना जानकर यांनी काँग्रेस आणि भाजपवर सडकून टीका केली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून काँग्रेस पक्ष दलित आणि मागासवर्गीय समाजाचे कल्याण करतो, असे सांगत आला आहे. मात्र, आजही दलित समाज मागासलेल्या अवस्थेमध्येच आहे. हे सत्य असून भाजपही त्याच पद्धतीने काम करत असल्याचे जानकरांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष गद्दार आहेत, असा घणाघातही जानकरांनी केला. तसेच इतर पक्षांवर टीका करण्यापेक्षा आपली ध्येयधोरणे जनतेसमोर मांडून पक्ष विस्तार करण्याच्या भूमिकेत असल्याचेही जानकरांनी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

Mhadev Jankar
Maratha Reservation : आरक्षणासाठी सर्वेक्षण करावे लागेल, त्यावर कोणीच बोलत नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com