Maratha Reservation : आरक्षणासाठी सर्वेक्षण करावे लागेल, त्यावर कोणीच बोलत नाही!

If indiscriminate Maratha community get Kunabi cast certificate, i will support that- मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देता येत असल्यास माझा पाठिंबा असेल...
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Sambhajiraje on Maratha reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत ही जरांगे पाटील यांची मागणी आहे. राज्य सरकार ती तपासून पाहत आहे. जर तसे शक्य असेल तर माझा पाठिंबाच असेल, असे प्रतिपादन स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केले. (Sambhajiraje says Poor Maratha community shall get justice)

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) मराठा समाजाच्या (Maratha) आरक्षणाच्या प्रश्नावर जालना येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी उपोषण केले होते. त्याबाबत ते नाशिक येथे (Nashik) बोलत होते.

Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje News : अजित पवारांनी विचार बदलला असेल, तर माझं ऐकलं अस समजू!

मराठा आरक्षणावर ते म्हणाले, जरांगे पाटील यांची मागणी राज्य सरकार तपासून पाहत आहे. मात्र, राज्यातील आजचे चित्र म्हणजे मूठभर नेते दोन समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करीत आहेत, यामध्ये तथ्य नाही. शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती, बारा बलुतेदार यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली.

शाहू महाराजांनी १९०२ मध्ये बहुजनांना आरक्षण दिले. त्यातअनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि मराठा समाजदेखील समाविष्ट होता. त्यामुळे माझे असे मत मत आहे, की गरीब मराठा समाजाला न्याय मिळायला पाहिजे. त्यावर सर्वांनी एक भूमिका घेण्याची गरज आहे.

सामाजिक, आर्थिक मागास म्हणून आरक्षण दिले, तेव्हा मी काही विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले होते. माझी मागणी होती, की आरक्षण देण्यासाठी सामाजिक मागास आहे हे कसे सिद्ध कराल?. त्यासाठी राज्यात सर्वेक्षण करावे लागेल. मात्र, त्यावर कोणीच बोलत नाही. न्यायालयाने आरक्षण ज्यांना दिले ते सामाजिक मागास नाहीत असे म्हटले आहे, तसे नाही हे सिद्ध करावे लागेल. त्यानंतर पुढच्या गोष्टी आहेत.

Sambhajiraje Chhatrapati
Maratha Hunger strike : उपोषणकर्ते पालकमंत्री दादा भुसे यांच्यासाठी हट्टाला पेटले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com