
कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीच्या परतण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नांदणी मठ आणि वनतराच्या सीईओमध्ये बैठक झाली. त्यानंतर माधुरी हत्तीण लवकरात लवकर परत येणार असे वनतराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वनतराच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली आणि त्यात सुप्रीम कोर्टात सरकार सोबत पक्षकार होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
नांदणी मठाच्या जवळ माधुरी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास मदत करणार असल्याचं वनतराकडून सांगण्यात आले. तर राजू शेट्टींनी माधुरी हत्तीणीवर काय उपचार करायचे असतील ते नांदणी मठातच करा असं म्हणत वनतराच्या भूमिकेला पाठिंबा दिला. दुसरीकडे वनतारानं पत्र काढत नांदणी मठ आणि कोल्हापूरकरांची माफी मागत सर्व प्रकारच्या मदतीची तयारी दर्शवली.
'पेट'च्या बोलावता धन्याची माधुरी हत्तीवरील वक्रदूष्टी कमी झाली असली तरी पेटाच्या आडून करीसिध्देश्वर मठ अलकनूर, रायबाग, शेडबाळ मठ, महांतेशट मठ रायचूर,गणपती संस्थान, तासगांव,अतिशय क्षेत्र कुंथूगिरी, अतिशय क्षेत्र कुंजवन उदगांव या धार्मिक स्थळातील मठातील हत्तीकडे वाकड्या नजरेने बघू नये, हतींच्या देखभालीबाबत जरूर त्या योग्य उपाययोजना सुचव्याव्यात त्याची पूर्तता केली जाईल. पण पैसा व संपत्तीच्या जोरावर, संस्कृती, रुढी, परंपरेला छेद देण्याचा प्रयत्न केल्यास त्यापेक्षाही तीव्र लढा उभा करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील श्री. शांतिसागर दिगंबर जैन आश्रम, शेडबाळ, हत्तीण ‘राजणिबाई (पद्मा)’, श्री करीसिद्धेश्वर मठ अलकणूर, गुरू महंतेश्वरस्वामी मंदिर बिचले रायचूर या तीन हत्तींबाबत सुनावणी होती. मात्र या तिन्ही मठातील दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाकडून पुढील सुनावणी 3 सप्टेंबर २०२५ देण्यात आली आहे.
कर्नाटकातील तीन मठात हालअपेष्टा होत असल्याचे वनविभागाच्या तपास अहवालात धक्कादायक बाबी उघड झाल्या. यानंतर, पर्यावरण कार्यकर्ते जी. आर. गोविंद यांनी जून २०२५ मध्ये न्यायालयात जनहित याचिका दाखल करत तातडीने या हत्तींच्या सुटकेची मागणी केली आहे.
न्यायालयाने प्रतिवादींना ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत हजर राहण्याचे किंवा उत्तर देण्याचे आदेश दिले होते. प्रतिवादी प्रत्यक्ष हजर राहिले होते. न्यायालय त्यांची उपस्थिती लक्षात घेऊन पुढील तारिख ०३ सप्टेंबर 2025 दिली. अशी माहिती शेडबाळ मठाचे ट्रस्टी राजू नांद्रे यांनी दिली.
याचिकेत दाखल करण्यात आलेल्या माहितीनुसार, पद्मा, ध्रुव आणि मेनका या कर्नाटकातील हत्तींवर अमानुष अत्याचार केला जात आहे. संबंधित हत्तींच्या त्वरित सुटकेची आणि त्यांना बेंगळुरू येथील बन्नेरघट्टा हत्ती पुनर्वसन केंद्रात हलवण्याची मागणी करण्यात आली आहे. हत्तीण पद्माला १५ तासांहून अधिक काळ एका बंधिस्त जागेत बांधले जात आहे. मिरवणुकांमध्ये कोणताही परवाना न घेता अनेकदा मानवी वस्तीत फिरवले जाते. तर तिला साखळदंडाने बांधल्याने तिच्या पायांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे याचिकेत नमुद केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.