Mahadevi Elephant : महादेवी हत्ति‍णी 'वनताराला' जाताच राजकारणाला सुरुवात; राजू शेट्टींचा गेम कोण करतंय?

Mahadevi Elephant : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणी नुकतीच गुजरातच्या वनतारा येथील खाजगी प्राणी देखभाल केंद्राकडे रवाना झाली.
Kolhapur bids emotional farewell to Mahadevi the elephant; controversy erupts as old letter by Raju Shetti supporting relocation resurfaces online.
Kolhapur bids emotional farewell to Mahadevi the elephant; controversy erupts as old letter by Raju Shetti supporting relocation resurfaces online.Sarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणी नुकतीच गुजरातच्या वनतारा येथील खाजगी प्राणी देखभाल केंद्राकडे रवाना झाली. या हत्ति‍णीला निरोप देताना अख्खा कोल्हापूर जिल्हा हळहळला. मात्र महादेवी पुढे जाताच मागे जिल्ह्यात राजकारणाला सुरुवात झाली आहे.

खरंतर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी हत्ति‍णीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. इतर राजकारणी शांत असताना शेट्टी रस्त्यावर उतरून कोल्हापूरकरांच्या लढाईत सहभागी झाले. त्याचवेळी त्यांचे जुने पत्र व्हायरल करून अज्ञातांनी खळबळ उडवून दिली आहे. या पत्रात महादेवी हत्तिणीला वन संग्रहालयात नेण्याची मागणी राजू शेट्टी यांनीच केल्याचे नमूद आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर राजू शेट्टी यांनी खुलासा केला आहे. 2018 मध्ये नांदणी मठातील हत्तीची देखभाल करणारा नागाप्पा हा माहुत हदयविकाराने आजारी पडला. डॉक्टरांनी त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. दरम्यान, माधुरीची सेवा करण्यासाठी प्रशिक्षित माहुत नसल्याने नांदणी मठाचे विश्वस्त माझ्याकडे आले. त्यांनी माहुत मिळेपर्यंत काही दिवसांसाठी सदरचा हत्ती वनविभागाच्या गडचिरोली हत्ती केंद्रात सोडण्याबाबत विनंती केली.

Kolhapur bids emotional farewell to Mahadevi the elephant; controversy erupts as old letter by Raju Shetti supporting relocation resurfaces online.
Mahadevi Elephant : एका हत्तीणीसाठी अख्खं 'कोल्हापूर' रडलं, गल्लीपासून दिल्लीपर्यंत झटलं... विनंती, याचिका, दगडफेक इतंकच काय 'जियोही' बायकॉट केलं!

त्यानुसार 2018 मध्ये वनविभागास पत्रव्यवहार केला. मात्र वनविभागाने या गोष्टीस असमर्थता दर्शविली. थोड्या दिवसांनी अथक प्रयत्नातून इस्माईल या माहूतास नांदणी मठाच्या विश्वस्तांनी शोधून आणले. त्या दिवसापासून आजअखेर माधुरीची चांगल्या पध्दतीने देखभाल व काळजी घेतली गेली आहे. काही मंडळी खोडसाळपणाने राजकीय आकसापोटी माझे 2018 मध्ये वनविभागास दिलेले पत्र सोशल मिडीयावर व्हायरल करत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com