Kolhapur Mahapalika list : कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे स्वप्न धुळीस; भाजपचा महापौर होणार? पाहा विजयी उमेदवार फक्त एका क्लिकवर

Kolhapur municipal election : कोल्हापूर महापालिकेच्या शुक्रवारी (ता.१६) लागेलल्या निकालात काँग्रेसचे सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न महायुतीने धुळीस मिळाल्याचे दिसून येत आहे.
Kolhapur Municipal Corporation Results
Kolhapur Municipal Corporation Resultssarkarnama
Published on
Updated on
Summary
  • कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ३५ जागांवर विजय मिळवला.

  • मात्र महायुतीने ४४ जागा जिंकत महापालिकेवरील सत्ता कायम राखली.

  • ठाकरे गटाला केवळ एकच जागा मिळाली, तर विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला एक जागा मिळाली.

Kolhapur municipal election News : कोल्हापूर महापालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात एकाकी झुंज देत तब्बत ३५ जागांवर विजय मिळवला आहे. मात्र महापालिकेवर तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचे काँग्रेसचे स्वप्न महायुतीने धुळीस मिळाले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्षालाही एका जागेवर समाधान मानावे लागले. त्याचवेळी महायुतीला ४४ जागा मिळाल्या असून विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला एक जागा मिळाली आहे.

कोल्हापूर महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह २ मंत्री, २ सत्ताधारी खासदार, १० आमदारांसह अनेक दिग्गजांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. दुसऱ्या बाजूला काँग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेसाठी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील एकटे ढाल झाले. त्यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची झाली.

दरम्यान २० प्रभागातून एकूण ८१ सदस्य निवडून आले असून काही प्रभागांमध्ये अत्यल्प मताधिक्याने निकाल लागला आहे. तर काही ठिकाणी एकतर्फी विजय नोंदवला गेला. यावेळी अनेक प्रभागांमध्ये महिलांनी बाजी मारली असून निकालानंतर विजयी जल्लोषासह काही ठिकाणी तणाव दिसून आला आहे.

Kolhapur Municipal Corporation Results
Nashik Municipal Corporation Election: भाजपच्या "हंड्रेड प्लस"ची शहरात उत्सुकता, कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार?

पण आता चुरस, प्रचारातील आरोप-प्रत्यारोपानंतर निकाल लागला असून भाजपने २५ जागा जिंकल्या आहेत. शिवसेनेला १५ अजितदादांच्या राष्ट्रवादीचे ४ असे मिळून महायुतीने एकूण ४४ जागांवर मजल मारली आहे. तर काँग्रेसने ३५ जागांवर मजल मारत ठाकरेंच्या शिवसेनेचीही एक जागा निवडून आणली आहे.

पाहा एका क्लिकवर २० प्रभागांतील ८१ विजयी उमेदवार

प्रभाग क्र. १

सुभाष राजाराम बुचडे(काँग्रेस)

पुष्पा निलेश नरुटे(काँग्रेस)

रूपाली अजित पोवार(काँग्रेस)

सचिन हरीश चौगुले(काँग्रेस)

प्रभाग क्र. २

वैभव दिलीप माने(शिवसेना)

अर्चना पगार(शिवसेना)

प्राजक्ता अभिषेक जाधव(शिवसेना)

स्वरूप सुनील कदम(शिवसेना)

Kolhapur Municipal Corporation Results
Thane Municipal Election Results : ठाणे मनपा निवडणूक निकाल; दिग्गजांना धक्का की नवख्यांची मुसंडी? एका क्लिकवर जाणून घ्या कोण जिंकले, कोण हरले!

प्रभाग क्र. ३

प्रमोद भगवान देसाई(भाजप)

वंदना विश्वजीत महाडिक(भाजप)

राजनंदा महेश महाडिक(भाजप)

विजेंद्र विश्वनाथ माने(भाजप)

प्रभाग क्र. ४

स्वाती सचीन कांबळे(काँग्रेस)

विशाल शिवाजी चव्हाण(काँग्रेस)

दिपाली राजेश घाटगे(काँग्रेस)

राजेश भरत लाटकर(काँग्रेस)

प्रभाग क्र. ५

विनायक कृष्णराव कारंडे(काँग्रेस)

स्वाती सागर यवलुजे(काँग्रेस)

सुरज संदीप सरनाईक(काँग्रेस)

अर्जुन आनंदराव माने(काँग्रेस)

प्रभाग क्र. ६

शिला अशोक सोनुले(शिवसेना)

माधवी प्रकाश गवंडी (राष्ट्रवादी)

दिपा दीपक काटकर (भाजप)

प्रतापसिंह तानाजी जाधव(काँग्रेस)

प्रभाग ७

विशाल किरण शिरोळे(भाजप)

दिपा अजित हाणके(भाजप)

मंगला महादेव साळुंखे(शिवसेना)

ऋतुराज राजेश क्षीरसागर(शिवसेना)

प्रभाग क्र. ८

अनुराधा सचिन खेडकर(शिवसेना)

ऋग्वेदा राहुल माने(काँग्रेस)

प्रशांत महादेव खेडकर(काँग्रेस)

इंद्रजीत बोंद्रे(काँग्रेस)

Kolhapur Municipal Corporation Results
Municipal Election Results : भाजपला अभूतपूर्व यश! 29 पैकी तब्बल 22 महापालिकांवर कमळ फुलले, 'या' 6 ठिकाणी विरोधकांचा झेंडा; वाचा संपूर्ण यादी!

प्रभाग क्र. ०९

विजयसिंह (रिंकु) देसाई(भाजप)

माधवी मानसींग पाटील(भाजप)

संगिकता संजय सावंत(शिवसेना)

शारंगधर वसंतराव देशमुख(शिवसेना)

प्रभाग क्र, १०

अजय इंगवले(शिवसेना)

अर्चना उत्तम कोरणे(भाजप)

पूर्वा राणे(भाजप)

अक्षय जरग (जनसुराज्य)

प्रभाग क्र. ११

निलांबरी साळुंखे(भाजप)

जयश्री सचिन चव्हाण(काँग्रेस)

सत्यजित चंद्रकांत जाधव(शिवसेना)

माधुरी किरण नकाते(भाजप)

प्रभाग क्र. १२

अश्किन गणी आजरेकर(शिवसेना)

स्वालिया साहिल बागवान(काँग्रेस)

अनुराधा अभिमन्यू मुळीक(काँग्रेस)

आदिल बाबू फरास (राष्ट्रवादी)

प्रभाग क्र.१३

माधुरी शशिकांत व्हटकर(भाजप)

रेखा रामचंद्र उगवे(भाजप)

प्रविण हरिदास सोनवणे(काँग्रेस)

नियाज अशिफ खान (राष्ट्रवादी)

प्रभाग क्र. १४

दिलशाद अब्दुल्ला मुल्ला(काँग्रेस)

निलिमा शैलेश पाटील(भाजप)

अमर प्रणव समर्थ(काँग्रेस)

विनायक विलासराव फाळके(काँग्रेस)

प्रभाग क्र. १५

रोहित शिवाजी कवाळे(काँग्रेस)

प्रतिज्ञा महेश उत्तुरे(ठाकरे गट)

सृष्टी किरण जाधव(भाजप)

संजय बसवराज महिते(काँग्रेस)

प्रभाग क्र. १६

उमेश देवाप्पा पोवार(काँग्रेस)

धनश्री कोरवी(काँग्रेस)

पुजा पोवार(भाजप)

मुरलीधर जाधव(भाजप)

प्रभाग क्र १७

अरुणा बिरांजे(काँग्रेस)

सचिन शेंडे(काँग्रेस)

शुभांगी पाटील(काँग्रेस)

प्रविण केसकर(काँग्रेस)

प्रभाग क्र. १८

अरुणा गवळी(काँग्रेस)

कौसर बागवान(शिवसेना)

रूपाराणी निकम(भाजप)

बबन उर्फ अभिजित मोरेश्री(भाजप)

प्रभाग क्र. १९

दुर्वास कदम(काँग्रेस)

मानसी लोळगे (राष्ट्रवादी)

डॉ. सुषमा जरग (काँग्रेस)

विजय सिंह खाडे-पाटील(भाजप)

प्रभाग क्र. २०

जयश्री धनाजी कांबळे(काँग्रेस)

सुरेखा सुनिल ओटवकर(भाजप)

वैभव अविनाश कुंभार(भाजप)

नेहा अभय तेंडुलकर(भाजप)

अभिजित शामराव खतकर(शिवसेना)

Kolhapur Municipal Corporation Results
Municipal Election Results : भाजपला अभूतपूर्व यश! 29 पैकी तब्बल 22 महापालिकांवर कमळ फुलले, 'या' 6 ठिकाणी विरोधकांचा झेंडा; वाचा संपूर्ण यादी!

FAQs :

1. कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसला किती जागा मिळाल्या?
काँग्रेसला एकूण ३५ जागांवर विजय मिळाला.

2. महापालिकेवर सत्ता कुणाची राहिली?
महायुतीने ४४ जागा जिंकत सत्ता मिळवली.

3. सतेज पाटील यांची भूमिका काय होती?
सतेज पाटील यांनी काँग्रेसची एकाकी झुंज नेत पक्षाला मोठी झेप दिली.

4. ठाकरे गटाची कामगिरी कशी राहिली?
ठाकरे गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

5. जनसुराज्य पक्षाला किती जागा मिळाल्या?
विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाला एक जागा मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com