Sambhaji Raje Chhatrapati : 'लाडक्या बहिणीचा खेळखंडोबा, व्हिजन कोणाकडेच नाही', संभाजीराजेंनी साधला निशाणा

Sambhaji Raje Chhatrapati Criticized Mahayuti & Mahavikas Aghadi: परिवर्तन महाशक्तीच्या वतीने 121 जागा लढवल्या जात आहेत. त्यामध्ये स्वराज पक्ष 40 जागा लढवत आहे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.
Sambhaji Raje Chhatrapati
Chhatrapati SambhajirajeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Vidhan Sabha Election: लाडक्या बहिणी योजनेसाठी महायुती सरकार पाठोपाठ महाविकास आघाडीने देखील दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी आपल्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊल पाडत आहे. यावर स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी टीका केली आहे. सर्व गोष्टींचा खेळखंडोबा सुरू असून कोणाकडेच व्हिजन नाही, अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

लाडक्या बहिणीवरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या वचननाम्यात दिलेल्या आश्वासनावरून बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, हा सर्व खेळखंडोबा सुरू आहे. पहिल्यांदा महायुतीने लाडक्या बहिनींना 1500 रुपये दिले. आता हे म्हणतात की आम्ही 3 हजार रुपये देऊ. व्हिजन बाँड प्रोग्राम कोणाचाही पाहायला मिळत नाही. 2029 ला काय देणार? 2034 ला काय देणार? याच्यावर कोण बोलत नाही. हे सर्व प्रकार दुर्दैवी आहे. अशी टीका संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

Sambhaji Raje Chhatrapati
Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे ओबीसी कार्ड; म्हणाले, एक है तो सेफ है!

परिवर्तन महाशक्तीच्या वतीने 121 जागा लढवल्या जात आहेत. त्यामध्ये स्वराज पक्ष 40 जागा लढवत आहे. आम्ही उमेदवारी ठरवत असताना प्रस्थापितांना सोबत घेतलेलं नाही. काही लोक त्याची खिल्ले उडवतील. आम्ही राजकारणात वेगळेपण आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करत आहे. त्रास होईल पण जनता निश्चित 75 वर्षेचे गढूळ राजकारण बाजूला करेल, असा विश्वास ही संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केला. चांगले लोक राजकारणात येत असतील आणि सुसंस्कृत महाराष्ट्र गरज असेल तर जनता आमच्या पाठीशी राहील, असेही संभाजीराजे म्हणाले.

माँसाहेब जिजाऊ शिवाजी महाराजांच्या गुरु

'संत रामदास त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मोठे असतील.किंबहुना आहेत. पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास यांना तुम्ही जर जोडलं तर ते तसं होऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आहेत. त्यांच्या एकच गुरु त्या जिजाऊ माँसाहेब आहेत. त्याचं महत्त्व असेल तर ते त्या ठिकाणी असावे. त्यांच्या महत्त्वाला आम्ही काय चॅलेंज करत नाही. समर्थ रामदासांना शिवाजी महाराज सोबत जोडायचं हे बरोबर नाही. आणि न पटणारे आहे, असे देखील संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

(Edited By Roshan More)

Sambhaji Raje Chhatrapati
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळे यांची आकडेवारी...अबब अख्खा महाराष्ट्र महायुतीचा लाभार्थी?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com