Vishal Patil : सांगलीत पुन्हा 'सांगली पॅटर्न'; काँग्रेसची साथ सोडत विशाल पाटलांचा बंडखोर जयश्री पाटलांना पाठींबा

Vishal Patil Support rebel Jayashree Patil :सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयश्री वहिनी पाटील यांच्यामध्ये ही लढत होत आहे.
Vishal Patil Jayashree Patil
Vishal Patil Jayashree Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangali News : सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी पुन्हा एकदा लोकसभेचा 'सांगली पॅटर्न' विधानसभेला राबवला आहे. बंडखोरी करून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जयश्री पाटील या निवडणूक रिंगणात आहे. जयश्री वहिनी या माझ्याच उमेदवार आहेत त्यांनाच निवडून द्या, असे जाहीर आव्हान देखील खासदार विशाल पाटील यांनी केले आहे.

जयश्री पाटील यांच समजूत काढण्यासाठी विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे जयश्री पाटलांच्या घरी गेले होते. मात्र, त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. मात्र, दोन दिवसातच विशाल पाटील यांनी जयश्री पाटील यांना आपला पाठींबा जाहीर केला.

सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होणार आहे. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील, भाजपचे उमेदवार सुधीर गाडगीळ आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयश्री वहिनी पाटील यांच्यामध्ये ही लढत होत आहे. आज (मंगळवारी) जयश्री पाटील यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडत भव्य सभा सांगलीच्या काँग्रेस कमिटी समोर घेण्यात आली. यावेळी या सभेला खासदार विशाल पाटील आणि त्यांचे भाऊ माजी मंत्री प्रतिक पाटील हेही उपस्थित होते.

Vishal Patil Jayashree Patil
Jitendra Awhad: सतेज पाटलाच्या अश्रूंवर जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'कोल्हापूरचा रांगडा गडी, पण...'

दादा घराण्यावर अन्याय का?

विशाल पाटील म्हणाले, मी सर्वांची क्षमा मागतो. जयश्री वहिनी यांना उमेदवारी मिळवून देऊ शकलो नाही. विश्वजित कदमसाहेब आणि मी कमी पडलो. आमच्या वसंतदादा कुटुंबाकडून काय चूक झाली की एकदा ही काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. निष्ठा आम्ही सोडली नाही. सातत्याने आमच्या कुटुंबावर अन्याय होत गेला. हा अन्याय का होत गेला हे अध्याप कळू शकले नाही.

जयश्री वहिनी माझ्या उमेदवारी सर्वात पुढे होत्या मग मी का त्यांच्या सभेला येऊ नये, अशी शंका निर्माण झाली. ही महाविकास आघाडी फक्त तीन पक्षाची नाही. यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, विशाल पाटील अपक्ष म्हणून सुद्धा ह्याच विकास आघाडीचा घटक आहे.

जयश्री पाटील विशाल पाटलांच्या उमेदवार

काँग्रेसने दिलेला उमेदवार हा भाजपच्या उमेदवाराला पराभव करण्या सारखा सक्षम नाही. म्हणून आम्ही उमेदवार दिला आहे. आणि हा माझा उमेदवार आहे हे मी जाहीर करतो. येणाऱ्या निवडणुकीत जयश्री वहिनी यांचाच विजय होणार. सांगलीला पहिल्यांदाच महिला आमदार निवडणार आहे. मला तुम्ही खासदार म्हणून निवडून दिले आहे. तसेच माझ्या विचाराचा आमदार निवडून द्या, असे आवाहन विशाल पाटील यांनी केले.

Vishal Patil Jayashree Patil
Heena Gavit : विधानसभेच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या हिना गावितांचा राजकीय प्रवास

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com