Winter Session 2023: उजनीच्या पाण्याचा भडका अधिवेशनात उडणार ; दोन आमदारांच्या बालेकिल्ल्यातील संघर्ष...

Madha News: उपोषणाच्या माध्यमातून पाण्याचा संघर्ष हा आंदोलकांनी अधिक तीव्र केला आहे.
Ujani Dam
Ujani DamSarkarnama
Published on
Updated on

Madha : गेल्या अनेक वर्षापासून उजनी धरणातून बेंदओढ्यामध्ये पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी माढा तालुक्यातील आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांच्या बालेकिल्ला असलेल्या कुर्डू जिल्हा परिषद गटातील तेरा गावांचा लढा हा हिवाळी अधिवेशनाच्या काळात नागपूरमध्ये देखील पाहायला मिळत आहे.

नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर माढा तालुक्यातील उजनी धरणाच्या पाण्याचा भडका निर्माण झाला आहे. उपोषणाच्या माध्यमातून पाण्याचा संघर्ष हा आंदोलकांनी अधिक तीव्र केला आहे.

सीना माढा सिंचन योजनेचे शिराळ ते कुर्डू राहिलेले काम पूर्ण करावे, सिनामाढा सिंचन योजनेची शिल्लक पाईपलाईन शेडशिंग येथे आणणे अथवा भीमा सिना जोडकाव्यातून बेंद ओढ्यात पाणी सोडावे. योजनेच्या माध्यमातून बेंद ओढ्यात पाणी सोडून कुर्डू व परिसरातील 13 गावांचा पाणी प्रश्न सोडवावा या मागण्या ग्रामस्थांच्या आहेत. याबाबत अधिवेशनात लक्षवेधी मांडण्यात येणार आहे.

Ujani Dam
Winter Session 2023: शिंदेंचं कार्यालय लयभारी; ठाकरे गटावर मात, शिवसेनाप्रमुख अन् धर्मवीरांच्या...

...तर मागण्या मान्य न झाल्यास मंत्रालयात धडकणार

पाण्याचा प्रश्न हा शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडित असून, आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न झाला आहे. आमच्या मागण्या सरकारने तत्काळ पूर्ण कराव्यात, अन्यथा मागणी पूर्ण न झाल्यास तेरा गावातील समस्त शेतकरी मंत्रालय येथे धडक देणार आहेत. ही वेळ आमच्यावर येऊ नये. या मागणीचा प्राधान्याने विचार करावा, असा इशाराही आंदोलक बेंद ओढा पाणी संघर्ष समिती व 13 गावांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com