Nagpur News : नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सभागृहात घमासान सुरू आहे. सभागृह बाहेरील परिसरात अधिकाऱ्यांचा राबता चालू आहे. राज्यातील प्रमुख पक्षांची कार्यालय थाटली आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे विधिमंडळ पक्ष कार्यालय सर्वात आखीव-रेखीव असल्याचे दिसते.
राज्यात शिवसेना पक्षात पहिली बंडाळी झाली. यामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटांची पक्ष कार्यालय विधिमंडळ परिसरात, कसे नियोजन असते, याची उत्सुकता सर्वांनाच असते. राज्याच्या सत्तेत असलेले शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्ष कार्यालय शिवसेना उद्धव ठाकरे गटापेक्षा सरस असल्याचे चित्र दिसते. सभागृहाबाहेर शिवसेना एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्ष कार्यालयात अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. कामासाठी आलेल्यांची वर्दळदेखील होती.
कार्यालयात जाताच समोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धकृती पुतळा दिसतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या छायाचित्रांच्या मोठ्या फ्रेम लावण्यात आलेल्या आहेत. कार्यालयाबाहेर बसण्यासाठी सोफासेट, खुर्च्या लावण्यात आल्या आहेत. आतमध्ये अधिकारी संगणकावर काम करताना दिसत आहेत. सभागृहातून माहितीसाठी निरोप येतात, त्याच्या प्रिंट काढून सभागृहात पोहोचवल्या जात होत्या. या अधिकाऱ्यांना एकमेकांशी बोलायलादेखील वेळ नाही.
या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालन आहे. या दालनासह संपूर्ण कार्यालयांमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या छायाचित्रांच्या प्रत्येकी तीन-तीन फ्रेम लावण्यात आलेल्या आहेत. या कार्यालयामध्ये शिंदे यांची छायाचित्रांच्या फ्रेम लावण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त इतर कोणाच्याही छायाचित्रांच्या फ्रेम नाहीत. या कार्यालयामध्ये वर्दळ असल्याचे पाहायला मिळते. पक्ष कार्यालयात बाहेर लावण्यात आलेल्या फलकांवर धनुष्यबाणाचे चिन्ह लावण्यात आलेले आहे. फलक हे संपूर्ण भगव्या रंगामध्ये आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्ष कार्यालयात सामसूम दिसत होती. कार्यालयाबाहेर असलेल्या मंडपात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे. काही सोफासेट आहेत. बोटावर मोजणे इतकेच अधिकारी कार्यालयात बसून होते. या कार्यालयामध्ये दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांची छायाचित्रे भिंतीवर आहेत. कार्यालयाबाहेर शिवसेना पक्ष कार्यालय एवढा एकच फलक लावण्यात आलेला आहे. हा फलकदेखील काहीसा जुना दिसतो.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.