Jayant Patil News: जयंत पाटलांचा शरद पवारांविषयी मोठा दावा; म्हणाले,' राज्यातील लोकांना सरकारपेक्षा...

Jayant Patil statement on Sharad Pawar: आज सहकारी साखर कारखान्याएवढेच खासगी कारखाने झाले आहेत. कारखानदारांचे प्रश्न समजून घेऊन साखर कामगारांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात, असा सल्लाही जयंत पाटील यांनी या कार्यक्रमात दिला.
Sharad Pawar, Jayant Patil
Sharad Pawar, Jayant PatilSarkaranama
Published on
Updated on

Kolhapur News : राज्यात कामगारांचे कायदे आता कमकुवत झाले आहेत.कामगारांनी आता अधिक संघटित झालं पाहिजे.खासगी असो किंवा सहकारी कारखान्यातील कामगार असो सर्वांनी मिळून एकत्र आले पाहिजे. साखर कामगारांच्या चळवळीने कधी कारखानदारांची अडवणूक केली नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला शरद पवार हा आपला आधार वाटतो, असं विधान माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचा कार्यक्रम गुरुवारी(ता.18) पन्हाळा येथे पार पडला. या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी सहकार क्षेत्र आणि साखर कारखान्यांच्या संदर्भात बोलतानाच शरद पवारांच्या मंत्रि‍पदाच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. शेती, सामाजिक, सांस्कृतिक अशा प्रत्येक क्षेत्रात सरकारपेक्षा मोठा आधार शरद पवार यांचा लोकांना वाटतो. जिद्द काय असते हे शरद पवारांकडून महाराष्ट्रामधील तरुण पिढी शिकेल,असंही जयंत पाटील म्हणाले.

बंद पडलेल्या खासगी कारखान्यांचं सहकारी करण्याचां एक काळ शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकाळात झाला. आज परिस्थिती बदलली आहे. सहकारऐवजी खासगी कारखानदार राज्यात वाढले आहे. आज सहकारी साखर कारखान्याएवढेच खासगी कारखाने झाले आहेत. कारखानदारांचे प्रश्न समजून घेऊन साखर कामगारांचे प्रश्न सोडवता येऊ शकतात, असा सल्लाही जयंत पाटील यांनी या कार्यक्रमात दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील म्हणाले, आता मोठ्या प्रमाणावर कायदे बदलण्यात आले आहेत. आज राज्यात आणि देशात कामगारांची आंदोलन सुरू आहेत, त्यांचे प्रश्न सुटत आहेत, असं चित्र नाही. राज्यकर्त्यांची मानसिकता आणि आंदोलकांची मानसिकता देखील याला कारणीभूत आहे. कामगार कायद्यात बदल झाल्यामुळे अनेक मुभा मिळाल्या आहेत.

Sharad Pawar, Jayant Patil
Election Commission News : राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगानेच केला धक्कादायक खुलासा; FIR ची दिली माहिती...

या कामगार कायद्यांमध्ये अनेक पळवाटा आले आहेत. कामगारांच्या हक्कांचा संरक्षण करण मोठी जबाबदारी संघटनांवर आली आहे. देशात मध्यमवर्गीयांची संख्या वाढत आहे.लोकांचा सुखवस्तू राहण्याकडे कल वाढला आहे. आणि या लोकांचा कामगार वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा चांगला नाही. शहरात राहणाऱ्यांचा एक स्टेटस निर्माण झाला आहे. राज्यकर्त्यांना देखील शहरात राहणाऱ्या लोकांचे प्रश्न महत्त्वाचे वाटू लागले असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, सोलापूरसारख्या जिल्ह्यात आजमितीला 38 साखर कारखाने आहेत. पूर्वी 1200 ते 1500 गाळप क्षमता असलेला कारखाना त्यामध्ये 2 हजार कामगार होते. पण आता गाळप क्षमता वाढली. पण कामगारांची संख्या घडली. उसापासून आज वीज, इथेनॉल आणि साखर तयार करता येते. हे सगळे बदल लक्षात घेऊन काही निर्णय घ्यावे लागतील,असंही पवार यांनी सांगितलं.

Sharad Pawar, Jayant Patil
Shivsena vs BJP : 'शिंदेंचा माजी नगरसेवक दादागिरी करतो...' महापालिका निवडणुकीआधीच शिंदे अन् भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा, 3 जण जखमी

शरद पवार म्हणाले, आतापर्यंत मी 7 वेळा कारखानदार आणि कामगार यांच्यात तोडगा काढून दिला. जशी मुंबई बदलली, तशी ही कारखानदारी बदलायची नाही. पूर्वी आम्ही खासगी कारखाना बंद पडला की, तो सहकारी करायचो. सरकारने आता धोरणात्मक निर्णय घ्यायची वेळ आली आहे. एखाद्या व्यक्तिकडे किती कारखाने असावेत हे निश्चित करून दिलं पाहिजे. सरकार काही करणार नाही, आम्हा लोकांनाच हे सरकारला पटवून द्यावे लागेल. मोजक्या लोकांच्या हातात असलेली कारखाना जास्त लोकांच्या हातात द्यावी लागेल असंही पवार यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com