Friendship Day Special : संसदेत पहिल्यांदाच भेटले अन् माने - विखे पाटील घराण्यात मैत्री फुलली...

Friendship Day Special| या दोघांपासून सुरु झालेली मैत्री आता दोघांच्याही पत्नी आणि मुलींपर्यंत येवून पोहचली आहे.
Friendship Day Special
Friendship Day Special
Published on
Updated on

दोघेही पहिल्यांदाच खासदार झाले होते. निवडून आल्यानंतर संसदेचे खासदार म्हणून ओळखपत्र घेण्याचा तो दिवस. त्यावेळी दोघांचाही नंबर एकमेकांच्या पुढे-मागेच होता. याच ओळखपत्राच्या निमित्ताने पहिल्यांदाच ओळख झाली ती खासदार धैर्यशील माने आणि खासदार सुजय विखे पाटील यांची. त्यावेळी झालेली दोघांची ओळख पुढच्या काहीच दिवसांमध्ये अशा काही घट्ट मैत्रीमध्ये रुजली की पक्षापलिकडे जावून कौटुंबिक नात तयार झालं आहे. त्यामुळे ही दोस्ती तुटायची नाय असेच दोघेही म्हणतात....

माने आणि विखे पाटील या दोन्ही घराण्यांना मोठी राजकीय पार्श्वभूमी. दोन्ही घराण्यांची सुरुवात काँग्रेसमधून. मात्र कालांतराने माने शरद पवारांसोबत गेले तर विखे पाटील पवारांच्या विरोधात. त्यामुळे महाराष्ट्रातील ही दोन राजकीय घराण्यांचा तसा कधीही संबंध आला नाही. मात्र सुजय विखे पाटील आणि धैर्यशील माने यांच्या रुपाने खासदार झाल्यानंतर या मैत्रीला सुरुवात झाली. दोघांची मैत्री रुजण्यास कारणीभुत ठरले ते सुजय विखे पाटील यांचे कोल्हापूरवरील प्रेम आणि कोल्हापूरमधील डॉ. पृथ्वीराज जाधव हे कॉमन मित्र.

सुजय विखे पाटील बेळगावमध्ये शिकायला असल्याने त्यांचा कोल्हापूरशी जुना स्नेह आणि हा जिल्हा म्हणजे त्यांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक. निसर्गाने भरभरुन दिले असल्याने ते कोल्हापूरला आवर्जून फिरायला येतात. तसेच तांबडा-पांढरा रस्सा म्हणजे सुजय विखे पाटील यांची अत्यंत आवडती डीश. पृथ्वीराज सोबत त्यांना तांबडा-पांढऱ्याची सवय लागली. त्यामुळे आता अनेकदा ते धैर्यशील माने यांच्या घरी खास तांबडा-पांढऱ्यासाठी येण्याचा बेत आखतात. माने सांगतात सुजयला दिल्लीतही तांबडा-पांढरा खायला आवडतो. त्यामुळे आम्ही दिल्लीत असतो तेव्हा मी कोल्हापूरचा घरचा कुक घेवून जातो. मग सुजय यांनीही धैर्यशील माने यांना आग्रह करुन लोणीला बोलावून प्रेमाने उकडं मटण खावू घातले होते.

दिल्लीत दोघांचेही घर जवळ-जवळ. तसेच कामाचे ठिकाण पण संसद हेच. त्यामुळे दोघांमधील बॉन्ड स्ट्रॉंग होण्यास आणखी मदत झाली. दिल्लीत आता दिवसातील एक तरी जेवण दोघेही एकत्र घेत असतात. पिक्चरला जाणे, एकमेकांच्या गावाकडे जाणे. या गोष्टी होत असतात. घरातील चांगल्या आणि वाईट गोष्टीलाही दोघे एकमेकांसोबत असल्याचे सांगतात. या दोघांपासून सुरु झालेली मैत्री आता दोघांच्याही पत्नी आणि मुलींपर्यंत येवून पोहचली आहे. दोघांच्याही पत्नी आणि लहानग्या मुली एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या आहेत.

कोरोना काळात धैर्यशील माने यांच्या सासऱ्यांचे निधन झाले. तेव्हा सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री यांनी वेदांतिका माने यांना प्रचंड मानसिक आधार दिला. तसेच कोरोना काळातच धैर्यशील माने आणि वेदांतिका माने या आजारी होत्या. धैर्यशील माने सांगतात, त्यावेळी सुजय यांनी काळजीपूर्वक आमची रोज विचारपूस केली. आजारी असताना असा एकही दिवस नव्हता जेव्हा सुजयचा फोन आला नाही. ते स्वतः डॉक्टर असल्याने आमच्या डॉक्टरांसोबत बोलायचे. काही मेडिकलविषयक सुचना द्यायचे, धीर द्यायचे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com