Kolhapur Politics: देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' बंद लिफाफ्यात कुणाचं नाव? महाडिक की कोरे

BJP Strategy for Kolhapur Political Representation : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदार अमल महाडिक हे दोन वेळा निवडून आले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यानंतर फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून अमल महाडिक यांना ओळखले जाते.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उद्या शपथ घेणार आहेत.उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्याला भाजपकडून कोणत्या नावाला हिरवा कंदील दिला जाईल? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

जिल्ह्यात दहा जागेवर महायुतीचा झेंडा फडकल्याने तिने पक्षांकडून मंत्रिपदावर दावा केला जात आहे. जिल्ह्यात चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर जिल्ह्यात तीन भाजपचे आमदार झाले आहेत. भाजपचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्तीचे दोन आमदार आहेत. त्यामुळे भाजपकडून मंत्रीपदावर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार? याची चर्चा आहे.

2014 ला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिलेले मंत्री चंद्रकांत पाटील याच्यानंतर जिल्ह्यात भाजपला एकही मंत्रीपद मिळवता आले नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात एक ही जागा भाजपला मिळवता आली नाही. त्यामुळे मागील पाच वर्ष काळात जिल्ह्यात भाजपला मंत्रीपद मिळाले नाही.

Devendra Fadnavis
Maharashtra Govt Formation: मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? सांगली-कोल्हापुरात कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता

अडीच वर्षाच्या महायुतीच्या कार्यकाळात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसलाच मंत्रीपद मिळाले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीला यश मिळाल्यानंतर भाजपकडून कोणाला मंत्रिपद मिळणार याची चर्चा अधिक आहे.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदार अमल महाडिक हे दोन वेळा निवडून आले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यानंतर फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून अमल महाडिक यांना ओळखले जाते. 2014 पासून ते आतापर्यंत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निधी खेचून आणण्यासाठी फडणवीस यांची मोठी मदत महाडिक यांना झाली आहे.

2019 च्या पराभवानंतर महाडिक यांनी फडणवीस यांच्या मदतीनेच मतदार संघात विकास कामांचा जोर ठेवला आहे. शिवाय बंधू राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना राज्यसभेत पाठवण्याची जबाबदारी खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती.

तर दुसरीकडे 2014 पासून भाजपचा घटक पक्ष बनलेल्या जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे हे देखील फडणवीस यांच्या निकटवर्तीय आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. 2019 ला देखील ते विरोधी बाकावर बसले. मात्र अडीच वर्षानंतर त्यांनी पुन्हा महायुती सोबत राहण्याचा निर्णय घेतला.

कोरे हे देखील महायुतीमध्ये या निवडणुकीत दोन जागा मिळवण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस भाजपकडून कोणाची वर्णी लावणार? हे पाहणे महत्त्वाचे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीस कोणला संधी देणार? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com