साताऱ्यात आजपासून रंगणार महाराष्ट्र केसरी स्पर्धा

तब्‍बल ६१ वर्षांनंतर महाराष्‍ट्र केसरीचे Maharashtra Kesari यजमानपद साताऱ्याला Satara राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार Sharad Pawar आणि कुस्‍तीगीर परिषदेचे अध्‍यक्ष बाळासाहेब लांडगे Balasaheb Landge यांच्‍यामुळे मिळाले आहे.
Maharashtra Kesari
Maharashtra Kesarisarkarnama
Published on
Updated on

सातारा : महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेसाठी राज्‍यभरातील मल्‍ल साताऱ्यात दाखल झाले असून, या स्‍पर्धेचे उद्‌घाटन आज (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्‍या हस्‍ते होणार आहे. या वेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामीण गृहराज्‍यमंत्री शंभूराज देसाई व इतर मान्‍यवर उपस्‍थित राहणार असल्‍याची माहिती राज्‍य कुस्‍तीगीर परिषद आणि जिल्‍हा तालीम संघाच्‍या वतीने देण्‍यात आली आहे. साताऱ्याच्या आखाड्यातून महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या वेळी कुस्‍तीगीर परिषदेचे कार्याध्‍यक्ष नामदेवराव मोहिते, कार्यकारी सचिव ललित लांडगे, जिल्‍हा तालीम संघाचे दीपक पवार, सुधीर पवार, संदीप मांडवे व इतर पदाधिकारी उपस्‍थित होते. दीपक पवार म्‍हणाले, ‘‘महाराष्‍ट्र केसरी स्‍पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, यात ४५ संघांच्‍या माध्‍यमातून राज्‍यभरातील ९०० च्‍या आसपास मल्‍ल आणि ११० प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. तब्‍बल ६१ वर्षांनंतर महाराष्‍ट्र केसरीचे यजमानपद साताऱ्याला राष्‍ट्रवादीचे अध्‍यक्ष शरद पवार आणि कुस्‍तीगीर परिषदेचे अध्‍यक्ष बाळासाहेब लांडगे यांच्‍यामुळे मिळाले आहे.

Maharashtra Kesari
शरद पवार म्हणतात; राज ठाकरे एका व्याख्यानानंतर चार महिने भूमिगत होणारे नेते

मातीचे दोन, तर गादी प्रकारातील आखाडे तयार करण्‍यात आले आहेत. या आखाड्यांच्‍या मदतीने दररोज दोन सत्रांत कुस्‍त्‍यांची रंगत सातारकरांना पाहावयास मिळणार असून, ५५ हजार प्रेक्षक एकावेळी या कुस्‍त्‍या पाहू शकणार आहेत. महिला व पुरुषांसाठी स्‍वतंत्र बैठक व्‍यवस्‍था केल्‍याचेही श्री. पवार यांनी या वेळी सांगितले. ललित लांडगे म्‍हणाले,‘‘ पाच दिवस राज्‍यभरातील नामवंत मल्‍ल याठिकाणी एकमेकांना भिडणार आहेत. या स्‍पर्धेची अंतिम फेरी शनिवारी (ता. ९) सायंकाळी पार पडणार आहे.

Maharashtra Kesari
राज ठाकरे सरड्यासारखे रंग बदलतात - अजित पवार

या स्‍पर्धेच्‍या निकालावेळी खासदार शरद पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्‍यवर मंत्री उपस्‍थित राहणार असून त्‍यांच्या हस्‍ते विजेत्‍या मल्‍लास महाराष्‍ट्र केसरीची गदा देण्‍यात येणार आहे. स्‍पर्धेत सहभागी होणाऱ्या मल्‍लांना आवश्‍‍यक त्‍या सुविधा पुरविण्‍यासाठी कुस्‍तीगीर परिषद आणि तालीम संघ कार्यरत आहे.’’

Maharashtra Kesari
जि. प. पराभवानंतर विजयकुमार गावितांचा भाजपवरच बॅाम्ब !

महाराष्ट्र केसरीचे हे दावेदार....

साताऱ्याच्या आखाड्यातून महाराष्ट्र केसरी कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. साताऱ्याच्या मातीत कुस्ती होत असताना किरण भगतने गेल्या अनेक वर्षांपासून सातारकरांच्या अपेक्षांना हलुकावणी देणारी चांदीची गदा पटकवावी, अशी सर्वांची इच्छा असली तरी, राज्याच्या विविध जिल्ह्यांतील ताकदीचे मल्लही महाराष्ट्र केसरीवर दावेदारी सांगत आहेत.

Maharashtra Kesari
महाराष्ट्र केसरी म्हणतात, 'आम्हालाही आमदार करा...' 

या स्पर्धेत राज्यातील बहुतेक जिल्ह्यांतील मल्ल गादी आणि माती विभागातून महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढणार आहेत. जागतिक स्पर्धेतील ब्राँझपदक विजेता कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील हा 'डार्क हॉर्स' ठरेल का, याबाबत कुस्तीप्रेमी आणि अभ्यासकांत जास्त चर्चा आहे. प्रतिकूल परिस्थितीतून आलेला माणच्या मातीतील साताऱ्याचा मल्ल उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतचे नावही सध्या आघाडीवर आहे. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर हा आता डबल महाराष्ट्र केसरी होण्यासाठी इच्छुक आहे.

Maharashtra Kesari
दोन्ही राजे आमचेच...सातारा पालिकेचा निर्णय फडणवीस घेतील...

बुलडाण्याचा महाराष्ट्र केसरी बाला रफिक हा माती विभागातून खेळतो. त्याला कुस्तीचा मोठा अनुभव आहे आणि डावपेचात तो तरबेज आहे. त्याला रोखण्यासाठी डावाला डाव देणारा मल्लच असला पाहिजे, अन्यथा बाला रफिकही साताऱ्यात इतिहास घडवू शकतो. मूळचे पुण्याचे पण आता मुंबई जिल्ह्याकडून खेळणारा आदर्श गुंड हा गादी विभागातून खेळतो. विविध डावांबरोबरच धोबीपछाड हा त्याचा हुकमी डाव आहे. अनेक नामवंत मल्लांना त्याने या डावाचा प्रसाद दिला आहे. तो धक्कादायक निकाल देऊ शकतो.

Maharashtra Kesari
सामाजिक प्रश्नावर खासदार उदयनराजे उभारणार स्वतंत्र यंत्रणा...

सिकंदर शेख हा वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहे. तो अनेक मल्लांपुढे आव्हान असणार आहे. माऊली जमदाडे, मुंबई शहरचा भारत मदने, समाधान पाटील, दत्ता नरळे, मुंबई शहर पश्‍चिमचा अक्षय गरुड, जालन्याचा उपमहाराष्ट्र केसरी विलास डोईफोडे, पुण्याचा महारुद्र काळेल असे अनेक मल्ल आता साताऱ्याच्या आखाड्यात सर्व शक्ती-युक्तीनीशी लढणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com