NCP Crisis : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नगर भाजप कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल !

Maharashtra Politics : नगरचे आमदार संग्राम जगताप अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar BJP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांचा सोबत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांच्या सहभागानंतर काही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या मूळ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत चलबिचल सुरू आहे.

2024 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवडणुक लढवण्याचा तयारीत असलेल्या अशा भाजप मतदारसंघात ही चलबिचल दिसून येत आहे. अशात आता कार्यकर्त्यांची चलबिचल वाढू नये, म्हणून भाजपच्या नेते कार्यकर्त्यांना दिलासा देत आहेत.

नगर जिल्ह्यातील नगरचे आमदार संग्राम जगताप अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत. साहजिकच 2024 मध्ये ते महायुतीचे उमेदवार असू शकतात. अशात भाजपच्या उमेदवारीबद्दल काय असा प्रश्न समोर आलेला आहे. त्यातून कार्यकर्त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया कुठे सोशल माध्यमातून तर कुठे पक्ष संघटनेतर्गत चर्चा सुरू झाली आहे.

Maharashtra Politics
Rohit Pawar slams Chhagan Bhujbal : हेच का आपलं वैचारिक अधिष्ठान ? ; रोहित पवारांचा भुजबळांना सवाल

या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद भैय्या गंधे यांनी राज्यात ज्या राजकीय घडामोडी होत आहेत त्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. भारतीय जनता पार्टीने दूरदृष्टीने हे निर्णय घेतले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विचलित होवू नये. खचून न जाता एकनिष्ठेने पक्षाचे कामे चालूच ठेवा. कितीही राजकीय उलथापालथी झाल्या तरी नगरचा लोकप्रतिनिधी हा ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचाच होईल, अशी ग्वाही कार्यकर्त्यांना दिली आहे.

भैय्या गंधे यांनी ही ग्वाही गुरुवारी( 6 जुलै) गणेश चतुर्थी निमित्ताने शहराचे ग्राम दैवत श्री विशाल गणेश मंदिरात दिली. "मी ही ग्वाही ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात देतो", असा आश्वासक दिलासा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Maharashtra Politics
Mahanaaryaman Scindia Started My Mandi : राजघराण्याचा वंशज, केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा विकतोय फळे-भाजीपाला..

शहर भाजपच्या वतीने शहर जिल्हाअध्यक्ष भैय्या गंधे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांच्या हस्ते त्यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले.

यावेळी महेंद्र गंधे यांचे भाषण झाले. कार्यक्रमात अॅड.विवेक नाईक यांची पक्षाच्या प्रदेश निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती बद्दल, जैन ओसवाल पतसंस्थेच्या संचालकपदी संतोष गांधी व जिल्हा मराठा पतसंस्थेच्या संचालकपदी उदय अनभुले यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सुनील रामदासी, सुवेंद्र गांधी, मालन ढोणे, तुषार पोटे, महेश नामदे, ज्ञानेश्वर काळे, बाबासाहेब सानप, प्रदीप परदेशी, अजय चितळे आदी उपस्थित होते.

अभय आगरकर म्हणाले, "भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे व देशाचे हित पाहूनच योग्यच निर्णय घेतले असतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी गोंधळून जाऊ नये. ज्या पदावर आपण काम करत आहोत ती जबाबदारी निष्ठेने पार पाडा,"

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com