Rohit Pawar slams Chhagan Bhujbal : हेच का आपलं वैचारिक अधिष्ठान ? ; रोहित पवारांचा भुजबळांना सवाल

Mumbai News : विचारधारेवर केवळ सत्तेसाठी आपण एका क्षणात पाणी सोडलं…
Rohit Pawar slams Chhagan Bhujbal
Rohit Pawar slams Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे विश्वासू, छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये भुजबळ सहभागी झाल्याने त्यावर टीका केली आहे.

"भुजबळ साहेब आयु्ष्यभर जपलेल्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर केवळ सत्तेसाठी आपण एका क्षणात पाणी सोडलं… हेच का आपलं वैचारीक अधिष्ठान?" असा सवाल रोहित पवार यांनी टि्वट करीत उपस्थित केला आहे.

Rohit Pawar slams Chhagan Bhujbal
Mahanaaryaman Scindia Started My Mandi : राजघराण्याचा वंशज, केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा विकतोय फळे-भाजीपाला..

"भुजबळ साहेब, पवार साहेबांनी नेहमी तुमची काळजी घेतली. एक लढाऊ शिलेदार म्हणून साहेबांचे तुम्ही पाठीराखे होतात. संकटाला न घाबरता तुम्ही जेलमध्ये गेलात, पण अचानक तुम्हाला असे काय झाले की तुमची भाषा १९० अंशात बदलली. साहेबांची साथ तुम्ही सोडली. स्वार्थांच्या आड येणारे सगळे आपल्याला बडवे वाटू लागले," असा टोला रोहित पवारांनी भुजबळांना लगावला.

Rohit Pawar slams Chhagan Bhujbal
Rohit Pawar Tweet: वळसे-पाटील साहेब, अजून काय पाहिजे ? ; रोहित पवारांचा सवाल ; साहेबांचा तुमच्यावर सर्वाधिक विश्वास..

आज (गुरुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी "आम्ही हा निर्णय का घेतला?" याबाबत भाष्य केलं. मुंबईतील पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.

"सातत्याने कुणी शब्द फिरवत असेल तर त्यांच्याबाबत राग येणं स्वाभाविक आहे. राष्ट्रवादीत सातत्याने या गोष्टी घडत गेल्या. अजित पवार यांनी याबाबत उघड वाच्यता केली. मीही त्यावर बोललो आहे, ..आमच्यावर सगळ्याचे प्रेम असतं तर हे घडलचं नसते," अशा शब्दात भुजबळांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केला.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com