Ajit Pawar News : के. पी. पाटलांचे कौतुक करताना अजितदादांना शरद पवारांची आठवण; म्हणाले, साहेबांच्या तालमीत तयार झाले...

KP Patil Joins Nationalist Congress Party : अजित पवार यांनी केपींचे पक्षात स्वागत करताना त्यांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ राहिलं असल्याचे सूचक विधान केले.
Ajit Pawar welcomes Kolhapur leader KP Patil into NCP, recalling Sharad Pawar’s legacy.
Ajit Pawar welcomes Kolhapur leader KP Patil into NCP, recalling Sharad Pawar’s legacy. Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज के. पी. पाटील यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी अजितदादांनी पाटलांवर कौतुकाचा वर्षाव करताना के. पी. पाटील हे शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झाले आहेत, असे सांगितले. ‘केपी’ यापुढे भावकी, मेव्हणे-पाहुणे हे वाद लवकरात लवकर सोडवा, असा सल्लाही अजितदादांनी त्यांना दिला.

अजित पवार यांनी केपींचे पक्षात स्वागत करताना त्यांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ राहिलं असल्याचे सूचक विधान केले. घरातला माणूस काही दिवस घराच्या बाहेर राहिला पण पुन्हा घरात आला की जो आनंद होतो तसाच आनंद आज झाला आहे. राज्यातील 200 साखर कारखान्यात सर्वात जास्त दर कोण देत असेल तर तो बिद्री साखर कारखाना आहे, असे कौतुक अजितदादांनी केले.

हसन मुश्रीफ हे आमच्या पक्षाचा चेहरा आहेत. कोल्हापूर हा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचा जिल्हा आहे. शिव- शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराने आपल्याला पुढे जावं लागेल. राधानगरी-भुदरगड मतदारसंघाला केपी तुमची गरज आहे. आपण एकमेकांत भांडत बसलो तर त्याचा फायदा दुसऱ्याला होतो. या वादाचा फटका तुम्हाला, पक्षाला बसत असतो. मला कुणावर टीका करायची नाही पण भोगावती, कुंभी, आजरा साखर कारखान्याची आज अवस्था काय आहे, असा सवाल अजित पवारांनी केली.

Ajit Pawar welcomes Kolhapur leader KP Patil into NCP, recalling Sharad Pawar’s legacy.
Pakistan airspace denial : थरारक Video! भारतातील 227 विमान प्रवाशांचा जीव होता धोक्यात; पाकिस्तानने दाखवली नाही दयामाया अन्...

नेतृत्व चांगले नसेल तर संस्थांची काय अवस्था होते हे पहा. आज केपी यांनी राज्यात एक नंबर कारखाना चालवला आहे. के पी पाटील हे शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झाले आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी त्यांचे कौतुक केले. के पी यापुढे भावकी, मेव्हणे-पाहुणे हे वाद लवकरात लवकर सोडवा. मोठ्या साहेबांनी अनेकदा के पी पाटील आणि ए वाय पाटील यांना एकत्र बसवलं, मुश्रीफ यांनी प्रयत्न केले, मी देखील काही सल्ले दिले, असे अजित पवारांनी सांगितले.

राजकारणात बेरजेचे राजकारण करायचं असतं. शरद पवारसाहेब यांनी नेहमी बेरजेचे राजकारण केलं आहे. राजकारण जरूर करावं, मात्र विकासकामांत कोणतीही अडचण आणू नये. असं जर कोण करत असेल तर तो माझ्या विचाराचा नाही, असा इशारा देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

Ajit Pawar welcomes Kolhapur leader KP Patil into NCP, recalling Sharad Pawar’s legacy.
Ahilyanagar Shrirampur : '40 वर्षांपासूनचा तिढा, आता भूमिपुजनाची जागा सोडून दुसऱ्याच ठिकाणी बांधकाम'; छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणी प्रकरण तापलं

मुश्रीफसाहेब जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, महापौर सगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवे आहेत. भुजबळ साहेब झाले मंत्री, हसन मुश्रीफ झाले मंत्री पण कार्यकर्त्यांनी काय करायचं, नेतृत्व तयार झाले पाहिजे. लोकसभेला, विधानसभेला काय करायचं ते करू पण तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या कामाला लागा, असे आवाहन ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com