Mahayuti News : पश्चिम महाराष्ट्रातील 3 बड्या नेत्यांच्या फाईल दिल्लीतून क्लिअर : राष्ट्रवादी अन् भाजप प्रवेश ठरला फायद्याचा

Mahayuti News : महाराष्ट्रातील 7 साखर कारखान्यांना कर्ज मंजुरी मिळाली आहे. राहुल पाटील, के.पी. पाटील आणि शरद लाड यांच्या राजकीय भुमिकांमुळे हे कर्ज मंजूर झाल्याची चर्चा आहे.
NCDC clears loans for Rahul Patil, kp patil, Sharad Lad sugar factories
NCDC clears loans for Rahul Patil, kp patil, Sharad Lad sugar factoriesSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti News : विधानसभा निवडणुकीनंतर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. हाच पक्षप्रवेश आता त्यांच्या फायद्याचा ठरला आहे. सहकारी क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या पण आर्थिक संकटात सापडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ अर्थात एनसीडीसीकडून कर्ज मंजूर झाले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश केलेल्या तीन नेत्यांशी संबंधित कारखान्यांचा समावेश आहे.

फडणवीस सरकारने राज्यातील 14 कारखान्यांना कर्जहमी देत राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडे कर्जासाठीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यापैकी 7 कारखान्यांना एनसीडीसीने कर्ज मंजूर केले आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील 4 कारखान्यांचा समावेश आहे. यापैकी 3 कारखान्यांशी संबंधित नेत्यांनी मागच्या काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेस अन् भाजपमध्ये प्रवेश केला होता. कारखाने अडचणीत असल्याने मदत मिळण्याची विनंती काही जणांनी केली होती. त्यावेळी दिवंगत नेते अजित पवार यांनी नेत्यांना शब्द दिला होता.

एनसीडीसीकडून कोल्हापूरच्या भोगावती सहकारी साखर कारखाना (114 कोटी), दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना (267.80 कोटी), तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना (139 कोटी), तसेच सांगलीचा क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना (72.56 कोटी) कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.

NCDC clears loans for Rahul Patil, kp patil, Sharad Lad sugar factories
Kolhapur Politics : निधी एकाचा उद्घाटन दुसऱ्याचं, श्रेयवादाच्या लढाईनं वातावरण तापलं; कोणाच्या उद्घाटनाला जायचे? अधिकाऱ्यांची कोंडी

विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे दिवंगत नेते पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्या पक्षप्रवेशाच्या भाषणात राहुल पाटील यांची राजकीय हमी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती. त्यावेळी भोगावती सहकारी साखर कारखान्याची आर्थिक अडचण लक्षात घेऊन स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालून प्रस्ताव दाखल केला होता.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून लेल्या माजी आमदार के. पी. पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवली. मात्र पराभवानंतर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी केली. त्यावेळी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः पक्षप्रवेश उपस्थित होते. राज्यातील सर्वात जास्त सभासद असलेला श्री वेदगंगा दूधगंगा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळख आहे.

NCDC clears loans for Rahul Patil, kp patil, Sharad Lad sugar factories
Maharashtra Politics: मोठी राजकीय घडामोड, विजयसिंह मोहिते पाटलांनी CM फडणवीसांच्या भेटीसाठी गाठलं मंत्रालय, रणजितसिंहांना पुन्हा आमदारकी मिळणार?

तिसरीकडे पुणे पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनीही भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. ते पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आमदार विनय कोरे यांच्याही कारखान्याला दुसऱ्यांदा कर्ज मंजूर झाले आहे. यापूर्वी जुलै 2024 मध्ये 350 कोटी कर्ज मंजूर झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com