Kolhapur Politics : निधी एकाचा उद्घाटन दुसऱ्याचं, श्रेयवादाच्या लढाईनं वातावरण तापलं; कोणाच्या उद्घाटनाला जायचे? अधिकाऱ्यांची कोंडी

Kolhapur Development Work Inauguration Row : कोल्हापूर महापालिकेत प्रथमच चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणूक झाली आहे. पण आता येथे होणाऱ्या विकास कामांच्या उद्‍घाटनामुळे अधिकाऱ्यांची मात्र कोंडी होताना दिसत आहे.
Kolhapur Politics
Kolhapur PoliticsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. कोल्हापूर महापालिकेत एकाच विकासकामाचे दोनदा उद्घाटन होत असल्याने वाद निर्माण झाला आहे.

  2. सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये श्रेय घेण्याची स्पर्धा वाढली आहे.

  3. या प्रकारामुळे महापालिकेचे अधिकारी संभ्रमात सापडले आहेत.

kolhapur municipal corporation News : कोल्हापूर महापालिकेत सत्ताधारी आघाडीत कुठे एक तर कुठे दोन, विरोधी आघाडीत दोन असे नगरसेवक असलेल्या प्रभागात एकाच विकास कामाचे दोन-दोन वेळा उद्घाटने होऊ लागल्याने कोणाच्या उद्‍घाटनाला जायचे? या कोंडीत अधिकारी सापडले आहेत. निधी आणायचा एकाने व उद्‍घाटने करायचे दुसऱ्याने असा प्रकार सुरू झाला असून त्यातून वाद होऊ लागले आहेत.

महापालिकेत प्रथमच चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार निवडणूक झाली. त्यात अनेक प्रभागात एकाच पक्षाचे नगरसेवक निवडून आले आहेत; पण जिथे सत्ताधारी व विरोधी असे नगरसेवक आहेत, तिथे अधिकाऱ्यांची कोंडी होत आहे.

एकाच प्रभागातील चारही सदस्य असल्याने त्यांना प्रभागात कामे करण्यास, निधी आणण्यास, उद्‍घाटने करता येतात.पण सध्या निवडणूक होऊन तीनच महिने झाले असून अजून निधी दिला जात नसल्याने जुनीच कामे सुरू आहेत. त्यातूनच उद्‍घाटनांना सुरुवात झाली आहे.

Kolhapur Politics
Kolhapur Politics : एका दाव्याने महापालिकेची गोची अन् घेतला मोठा निर्णय; ठाकरे गटाची हक्काची जागा गेली

निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीने विकासकामांना निधी दिला. त्या कामांची पूर्तता झाली आहे. तिथे काही विरोधी आघाडीतील नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांंच्याकडून उद्‍घाटने केली जात आहेत.

ते नगरसेवक असल्याने त्यांनी बोलवल्यास अधिकाऱ्यांना जावे लागते; पण काही ठिकाणी पूर्वी सत्ताधाऱ्यांनी आणलेल्या कामांचे उद्‍घाटन होत असेल तर तिथे विरोधी गटाच्या कार्यक्रमाला जायचे अधिकारी टाळत आहेत. उद्‍घाटनाची ईर्ष्या सुरू असल्याने अधिकाऱ्यांची कोंडी होत आहे.

हद्द बदलली, कामाचा विषय संपला

नवीन प्रभाग रचनेत काहींचे भाग दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. तिथे पूर्वी केलेल्या कामांबाबत अशा काही नगरसेवकांकडून पाठपुरावा केला जात आहे. मात्र, आता प्रभागातील नगरसेवक दुसरेच असल्याने त्यांना हे खटकत आहे. आम्ही आमच्या भागातील पाहतो, असे सांगितले आहे. त्यातूनही खटके उडत आहेत.

Kolhapur Politics
Kolhapur Politics : कोल्हापुरात काँग्रेसप्रणित आघाड्यांना सुरुंग लावण्यासाठी शिवसेनेची फिल्डिंग; पालकमंत्री आबिटकर अॅक्टिव्ह मोडमध्ये

FAQs :

1. कोल्हापूर महापालिकेत नेमका वाद काय आहे?
एकाच विकासकामाचे दोनदा उद्घाटन होत असल्याने वाद निर्माण झाला आहे.

2. हा वाद कोणामध्ये आहे?
सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये हा वाद आहे.

3. अधिकारी का अडचणीत आले आहेत?
कोणाच्या उद्घाटनाला उपस्थित राहायचे याबाबत त्यांना संभ्रम आहे.

4. या वादाचे कारण काय आहे?
विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय स्पर्धा वाढली आहे.

5. याचा प्रशासनावर काय परिणाम होतोय?
प्रशासनातील कामकाजावर परिणाम होऊन गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com