Satyajit Tambe: सत्यजीत तांबेंची लक्षवेधी अन् बावनकुळेंनी उपनिबंधकांची केली बदली; नेमकं काय आहे प्रकरण?

MLA Satyajit Tambe IN Maharashtra Winter Session :आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करताच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा संगमनेर उपनिबंधकांवर कारवाईचा आदेश दिला.
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेमध्ये संगमनेरच्या इंदिरानगरमधील रहिवाशांच्या घराच्या नोंदणीची लक्षवेधी उपस्थित करताच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संगमनेरमधील उपनिबंधक यांच्या बदलीचा आदेश केला. इंदिरानगरमधील सुमारे 772 नागरिकांच्या पोकळी हिस्सा नोंदी पुढील तीन दिवसात युद्ध पातळीवर पूर्ण करतील. यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ वापरून, नोंदणी महानिरीक्षक सर्व नोंदी पूर्ण करतील, असे महसूल मंत्री यांनी आदेशात स्पष्ट म्हटले.

संगमनेरच्या इंदिरानगरमधील रहिवाशांच्या घराच्या नोंदणीचा अनेक वर्षापासून प्रश्न आहे. या संदर्भात आमदार सत्यजीत तांबे गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. या संदर्भात त्यांनी विधान परिषदेमध्ये लक्षवेधी मांडली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा लक्षवेधीची गंभीर दखल घेतली.

संगमनेरमधील प्रलंबित मालमत्ता नोंदणी प्रश्न खूप गंभीर आहे. उपनिबंधक नागरिकांशी अरेरावीची भाषा करतात. राजकीय हेतूने जाणीवपूर्वक नोंदी घेण्यास टाळाटाळ करतात. याकडे सत्यजीत तांबे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. महसूल मंत्री बावनकुळे यांनी आमदार तांबे यांच्या प्रश्नाची दखल घेत, सभागृहातच उपनिबंधक जाधव यांच्या बदलीची घोषणा केली. नोंदणी महानिरीक्षक यांना पुढील तीन दिवसात संगमनेरला जाऊन संबंधित प्रकरणाच्या चौकशीचा आदेशही मंत्री बावनकुळे यांनी दिला.

नोंदणी महानिरीक्षकांच्या चौकशीमध्ये जर उपनिबंधक जाधव दस्त लावण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर निलंबनाची देखील कारवाई केली जाईल, असाही इशारा मंत्री बावनकुळे यांनी दिला. संगमनेरच्या इंदिरानगर मधील 722 नागरिकांच्या पोकळी हिस्सा नोंदणीचा प्रश्न गंभीर आहे. आमदार तांबे यांच्या या लक्षवेधीने आता तेथील नागरिकांना घराच्या नोंदणीचा प्रश्न मार्गी लागला आहे.

Satyajeet Tambe
Bandu Andekar: आंदेकर गँगची राजकारणात पुन्हा एन्ट्री; बंडू आंदेकरसह तीन जण PMC निवडणूक लढणार, कोर्ट काय म्हणाले?

संगमनेरच्या इंदिरानगरचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाल्याने, आता मालदड रस्त्यावरील आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल. या भागात भाजीपाला मार्केट, मैदान आणि शैक्षणिक कारणासाठी अनेक वर्षांपासून जागा आरक्षित आहे. लवकरच हा तिढा सुटेल आणि नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केला.

दरम्यान आमदार तांबे यांच्या या लक्षवेधीनंतर उपनिबंधक जाधव यांचे कारनामे चर्चेत आले आहेत. इंदिरानगर मधील नागरिकांना दस्त नोंदणी वेळीस कसा त्रास दिला गेला याचे किस्से चर्चिले जात आहेत. नोंदणी महानिरीक्षक यांच्यासमोर उपनिबंधक जाधव यांचे प्रताप उघडकीस आणणार असल्याचे, काही नागरिकांनी निर्णय घेतला असल्याचे देखील सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com