Mahavikas Aghadi : कडेगावमध्ये गाजणार 'मविआ'च्या प्रचाराचा ट्रेलर, वाचा कोण कोण राहणार उपस्थित?

Assembly Election 2024 Mahavikas Aghadi News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा प्रचाराचा पहिला ट्रेलर सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे गाजणार आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas AghadiSarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 28 August : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा प्रचाराचा पहिला ट्रेलर सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथे गाजणार आहे. इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येणार आहेत.

येत्या 5 सप्टेंबर रोजी कडेगाव येथे स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शक्ति प्रदर्शनाची जोरदार तयारी केली असून महाविकास आघाडीचा प्रचाराचा ट्रेलर पाहायला मिळणार आहे. याबाबतची माहिती आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.

शैक्षणिक क्षेत्रात सांगली जिल्ह्यातील सुपुत्र स्वर्गीय पतंगराव कदम यांचे उल्लेखनीय कार्य आहे. 5 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक दिनाचा मुहूर्त साधून त्यांच्या पुतळ्याचे अनावरण कडेगाव येथे केले जाणार असून या कार्यक्रमासाठी राहुल गांधी, राष्ट्रवादीचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार, (Sharad Pawar) माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहेत.

Mahavikas Aghadi
Rajkot Fort Rada : राणे अन् ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा! आदित्यही चिडले, म्हणाले; मला ते घाबरतात, कारण...

तसेच काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब  थोरात, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यासहअनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कडेगाव येथे जय्यत तयारी करण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पहिलाच महाविकास आघाडीचा मोठा कार्यक्रम होणार आहे.

याच व्यासपीठावरून विश्वजीत कदम आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान हे सर्व नेते एकत्र येत असल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिला ट्रेलर आघाडी या निमित्ताने दाखवणार आहे. पतंगराव कदम यांचे मूळ गाव असलेल्या सोनसळ येथे हा पुतळा उभारण्यात आला असून कडेगाव येथील बयाबाई कदम महाविद्यालयाच्या मैदानावर हा मेळावा पार पडणार आहे.

Mahavikas Aghadi
Shivsena Party And Symbol : तारीख पे तारीख! शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत आता 'या' दिवशी सुनावणी

मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून जवळपास दोन ते अडीच लाख लोक येतील असा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडी सांगली जिल्ह्यातील विधानसभेचे रणशिंग फुंकनाथ असल्याचे सांगितले जात आहे. तर महायुतीचं सरकार असंवैधानिक असल्यामुळे महिला आणि मुलींना संरक्षण देण्यास ते कमी पडत आहेत. महिलांच्या हितासाठी हे सरकार आहे, असा ढोल सत्ताधारी वाजवत आहेत. पण राज्यातील महिला आणि मुलींवर अन्याय होताना, ते थांबविण्यासाठी काहीच उपाययोजना झाल्या नाहीत. असा आरोप विश्वजीत कदम यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com