Kolhapur Politics : कोल्हापूर उत्तरेत 'मविआ'चा उमेदवार ठरेना; मधुरिमाराजे-मालोजीराजेंचीही माघार

Kolhapur North Assembly Elections : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमधील घोळ कायम आहे. एकीकडे ही जागा काँग्रेसची असल्याचं जवळपास निश्चित होत असतानाच शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने या जागेवर दावा केला आहे.
Satej Patil, Malojiraje Chhatrapati, Madhurimaraje Chhatrapati
Satej Patil, Malojiraje Chhatrapati, Madhurimaraje ChhatrapatiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 24 Oct : कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North Assembly) मतदारसंघावरून महाविकास आघाडीमधील घोळ कायम आहे. एकीकडे ही जागा काँग्रेसची असल्याचं जवळपास निश्चित होत असतानाच शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने या जागेवर दावा केला आहे.

जागावाटपाचा घोळ संपल्यानंतर ही जागा काँग्रेसकडे गेली असल्याचे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र काँग्रेसकडून उमेदवार कोण? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

अशातच उत्तरमधून काँग्रेसचे (Congress) नेते आणि माजी आमदार मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati) किंवा मधूरीमाराजे छत्रपती यांना मैदानात उतरण्याची शक्यता होती. मात्र, आता या दोघांनीही मैदानातून माघार घेतल्याचे स्पष्ट झालं आहे. या जागेवर काँग्रेसकडून नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.

शिवाय तो कार्यकर्त्यांपैकीच एक असेल असे संकेत आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिले आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून खासदार शाहू महाराज छत्रपती यांची सून मधुरिमा राजे छत्रपती यांना मैदानात उतरवण्याची शक्यता होती.

Satej Patil, Malojiraje Chhatrapati, Madhurimaraje Chhatrapati
Solapur Politics: सोलापूर शहर दक्षिण जागेचा तिढा सुटला; पण, माजी आमदाराच्या पोस्टनं वाढवलं आघाडीच्या नेत्याचं टेन्शन

मात्र, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमा राजे छत्रपती यांनी उत्तरमधून लढण्यास नकार दिला आहे. बुधवारी काँग्रेसचे (Congress) नेते सतेज पाटील, खासदार शाहू महाराज छत्रपती, मालोजीराजे छत्रपती यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर हे दोघ निवडणूक लढवणार नसल्याचं सांगण्यात आलं.

तसेच यानंतर काही इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. यामध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख, राजेश लाटकर यांच्यासह अन्य इच्छुक मुलाखतीसाठी आले होते. तर येत्या दोन दिवसात मुलाखत दिलेल्यांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सतेज पाटील यांनी दिली.

Satej Patil, Malojiraje Chhatrapati, Madhurimaraje Chhatrapati
Mahayuti Seat Sharing: अजितदादा की फडणवीस कुणाचा शब्द खरा ठरणार? मुळीक, टिंगरे 'गॅसवर'

महायुतीच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब?

महाविकास आघाडीकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात अद्याप काँग्रेसचा चेहरा निश्चित झाला नसला तरी महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र, काँग्रेसचा चेहरा कोण असणार हे येत्या दोन दिवसातच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com