MNS News: देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मनसेचा उमेदवार ठरला?

Maharashtra Vidhansabha Election Vidhansabha Election 2024:आगामी विधानसभा विधानसभा निवडणुकीत 220 ते 240 जागा लढणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी काही दिवसापासून राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
MNS News
MNS NewsSarkarnama
Published on
Updated on

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा विदर्भ दौरा सुरु असतानाच मनसेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात मनसेने उमेदवार देण्याचे ठरवले आहे. तुषार गिरे हे या मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. फडणवीसांच्या विरोधात उमेदवार देऊन त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करण्याची तयारी मनसेने केली आहे.

आगामी विधानसभा विधानसभा निवडणुकीत 220 ते 240 जागा लढणार असल्याचं राज ठाकरे यांनी जाहीर केले आहे. त्यासाठी काही दिवसांपासून राज ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. प्रमुख पदाधिकाऱ्यांची चर्चा करुन ते उमेदवारांची चाचपणी करीत आहेत.

MNS News
Surendra Pathare: 'साहेब दैवत आहेत, असं म्हणणारे त्यांना का सोडून गेले'; सुनील टिंगरेंची पठारेंनी उडवली खिल्ली

राज ठाकरे यांनी नुकताच विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत मतदारसंघाचा आढावा घेतला.नागपूरमधील सर्व 6 विधानभा मतदारसंघावर लढण्याची तयारी करा, असा आदेश राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

राज ठाकरे याचे पुत्र अमित ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या माहीम, भांडुप, दिंडोशी,कलिना, चांदीवली किंवा मागाठणेमधून अमित ठाकरे यापैकी कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढवायची याची चाचपणी मनसेकडून करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com